K Annamalai : राजीनामा दिल्यानंतर के. अण्णामलाई यांची मोठी घोषणा! रजनीकांत यांचं नाव घेत केला खुलासा म्हणाले
K Annamalai : मात्र आता जनतेशी थेट जोडलेले, पारदर्शक आणि तळागाळातील राजकारण उभे करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे.

K Annamalai : तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई (K Annamalai ) यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देत नव्या राजकीय वाटचालीची घोषणा केली आहे. शुक्रवारी (5 जून) त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर करत ‘We The Leader’ या नावाने नवीन राजकीय चळवळ सुरू करण्याची माहिती दिली.
अण्णामलाई यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा आढावा घेताना सांगितले की, 2009 मध्ये त्यांनी डीएमडीकेमध्ये इंटर्नशिप केली होती, तर 2020 मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले. मात्र आता जनतेशी थेट जोडलेले, पारदर्शक आणि तळागाळातील राजकारण उभे करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे. (K Annamalai)
अन्नामलाई यांनी केला मोठा खुलासा (K Annamalai)
यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा खुलासाही केला. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अभिनेते रजनीकांत यांनी त्यांना फोन करून आपल्या संभाव्य राजकीय पक्षात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांना दिलेल्या शब्दामुळे त्यांनी तो प्रस्ताव नाकारत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
हेही वाचा : Bal Mane : बाळ मानेंची ठाकरे गटातून हकालपट्टी; आता भाजप प्रवेशाची चर्चा, नितेश राणेंसोबत मुंबई गाठली?
अण्णामलाई यांनी सांगितले की, ‘We The Leader’ या चळवळीअंतर्गत राजकारणात स्वच्छता, नैतिकता आणि नेतृत्वगुणांना प्राधान्य दिले जाईल. या उपक्रमाशी जोडल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘APJ Abdul Kalam Ethics in Politics’ संस्थेमार्फत राजकीय आणि नैतिक नेतृत्वाचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. हेच आंदोलन भविष्यात एका नवीन पक्षाचे रूप घेईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. राजकीय पक्ष स्थापन झाल्यास घराणेशाही आणि वंशवादी राजकारणाला आळा घालण्यासाठी कार्यकाळ मर्यादा लागू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. (K Annamalai )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर व्यक्त करताना अण्णामलाई म्हणाले की, त्यांच्या मनात मोदींबद्दल कायम सन्मान राहील. मात्र एखाद्या विषयावर मतभेद झाल्यास ते स्पष्टपणे आपली भूमिका मांडतील. भाजपमध्ये असतानाही त्यांनी त्रिभाषा धोरणाला विरोध केल्याचे त्यांनी नमूद केले.
राजीनाम्याबाबत बोलताना अण्णामलाई यांनी सांगितले की, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पक्षातील काही उणिवा आणि आपली मते स्पष्टपणे मांडली. त्यानंतरच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. “दूरून राजीनामा पाठवणाऱ्यांपैकी मी नाही. पक्ष नेतृत्वासमोर माझी भूमिका स्पष्ट केल्यानंतरच मी सन्मानपूर्वक बाहेर पडलो,” असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Breaking News : माझे नशीब.! कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके दिल्लीकडे रवाना; ट्विट करत म्हणाले….





