Bal Mane : बाळ मानेंची ठाकरे गटातून हकालपट्टी; आता भाजप प्रवेशाची चर्चा, नितेश राणेंसोबत मुंबई गाठली?
Bal Mane : बाळ मानेंसाठी महायुतीकडून विशेष प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. हकालपट्टीनंतर बाळ माने हे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत चार्टर्ड विमानाने मुंबईत दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.

Bal Mane : कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बाळ माने रिंगणात होते. मात्र, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी बाळ मानेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेताना बाळ मानेंसोबत भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गटाने बाळ मानेंवर तातडीने कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली, तर माजी खासदार विनायक राऊत यांनी बाळ मानेंचा उल्लेख “गद्दार” असा केला. (Bal Mane )
दरम्यान, बाळ मानेंसाठी महायुतीकडून विशेष प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. हकालपट्टीनंतर बाळ माने हे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत चार्टर्ड विमानाने मुंबईत दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : Breaking News : आनंदाची बातमी आलीच.! ऑटो LPG झाला स्वस्त, झाली मोठी कपात
सूत्रांच्या माहितीनुसार, अर्ज दाखल केल्यानंतर स्थानिक राजकीय परिस्थितीची माहिती पक्ष नेतृत्वाला दिली होती. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीतील नेत्यांकडून त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधला जात होता. विशेषतः नितेश राणे यांनी या घडामोडींमध्ये सक्रिय भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडूनही पुरेसा पाठिंबा मिळत नसल्याने अखेर बाळ मानेंनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. आता त्यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जात असून, येत्या काही दिवसांत ते अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही ते लवकरच भेट घेणार असल्याची चर्चा आहे.
बाळ माने हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील असून ते यापूर्वी भाजपचे आमदार राहिले आहेत. रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपला रामराम ठोकत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या राजकीय घडामोडींमुळे पडद्याआडून सुरू असलेल्या राजकारणाची जोरदार चर्चा होत आहे.
…अन् स्टेट्समुळे चर्चांना उधाण (Bal Mane )

Bal Mane : बाळ मानेंची ठाकरे गटातून हकालपट्टी; आता भाजप प्रवेशाची चर्चा, नितेश राणेंसोबत मुंबई गाठली?
दरम्यान, ठाकरे गटातून हकालपट्टी केल्यानंतर बाळ माने यांनी व्हॉट्सअॅपवर दोन स्टेटस ठेवले आहेत. यामध्ये मनाच्या ज्या दरवाज्यातून संशय आत प्रवेश करतो, त्याचवेळी त्या दरवाज्यातून प्रेम आणि विश्वास दोन्ही बाहेर पडतात. रिव्हेंज इज जस्ट वेस्ट आँफ टाईम…असं बाळ माने यांनी स्टेटसद्वारे म्हटलं आहे. तर दुसऱ्या स्टेटसद्वारे बाळ माने यांनी आरएसएसचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केलं आहे. यामुळे पहिल्या स्टेट्समधून त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? याविषयी विविध तर्क वितर्क लावले जात आहे.
हेही वाचा : Ghee Benefits: सकाळी रिकाम्या पोटी तूप खाण्याबाबत ऐकले आहे का? जाणून घ्या रिकाम्या पोटी सेवनाचे फायदे





