Jyotiraditya Scindia : काँग्रेस केवळ सत्तेची भुकेली; ज्योतिरादित्य सिंधिया यांचा घणाघात.
Jyotiraditya Scindia : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

Jyotiraditya Scindia : तमिळनाडूमध्ये तमिळगा वेत्री कझगम प्रणित सरकारला पाठिंबा देण्यावरून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी रविवारी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसला जनतेचे प्रेम आणि आशीर्वादाची भूक नाही, तर केवळ सत्ता आणि पदाची भूक आहे, अशी टीका त्यांनी केली. (Jyotiraditya Scindia)
तामिळनाडूमध्ये काँग्रेसने आपला जुना मित्रपक्ष असलेल्या डीएमकेशी संबंध तोडून अभिनेते विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिला आहे. आगामी सर्व निवडणुकांसाठी ही युती कायम असेल, असेही काँग्रेसने जाहीर केले आहे. (Jyotiraditya Scindia)
आपल्या गुना लोकसभा मतदारसंघाकडे रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना सिंधिया म्हणाले की, हे वास्तव आता सर्वांना माहीत झाले आहे. मी गेल्या सहा वर्षांपासून हेच सांगतोय की, काँग्रेसला सत्तेशिवाय काहीही दिसत नाही. (Jyotiraditya Scindia)
केरळमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करण्यावरूनही त्यांनी काँग्रेसवर टीका केली. सिंधिया यांच्या मते, काँग्रेसने उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम अशा सर्वच ठिकाणी जनतेचा विश्वास गमावला आहे आणि आता हळूहळू ते स्वतःच्या कार्यकर्त्यांचाही विश्वास गमावतील.२०२० मध्ये सिंधिया यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता, ज्यामुळे मध्य प्रदेशातील तत्कालीन काँग्रेस सरकार कोसळले होते. (Jyotiraditya Scindia)





