कोण आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना ? जे होणार देशाचे नवे सरन्यायाधीश ; CJI चंद्रचूड यांनी मोदी सरकारकडे दिले नाव

Justiv Mr.Sanjeev Khanna । सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे वरिष्ठ न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना सरन्यायाधीश (CJI) बनवण्याची शिफारस केंद्र सरकारला पाठवली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होत आहेत. न्यायमूर्ती खन्ना हे ११ नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश होणार आहेत. त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल. न्यायमूर्ती संजीव खन्ना पुढील वर्षी 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत.
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा जन्म 14 मे 1960 रोजी झाला. 1983 मध्ये त्यांची दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी झाली होती. त्यांनी सुरुवातीला तीस हजारी कॉम्प्लेक्स येथील जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस केली आणि नंतर दिल्ली उच्च न्यायालयात आणि न्यायाधिकरणांमध्ये प्रवेश केला.
आयकर विभागात वरिष्ठ स्थायी वकील म्हणून काम Justiv Mr.Sanjeev Khanna ।
त्यांनी दीर्घकाळ आयकर विभागात वरिष्ठ स्थायी वकील म्हणून काम केले आणि 2004 मध्ये त्यांची दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेशासाठी स्थायी वकील (सिव्हिल) म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील आणि ॲमिकस क्युरी म्हणून अनेक फौजदारी खटल्यांमध्ये हजेरी लावली आणि युक्तिवाद केला.
दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती Justiv Mr.Sanjeev Khanna ।
2005 मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती देण्यात आली आणि 2006 मध्ये त्यांना कायम न्यायाधीश बनवण्यात आले. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी दिल्ली अकादमी, दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र आणि जिल्हा न्यायालयाचे अध्यक्ष/प्रभारी पदही भूषवले आहे.
हेही वाचा
“चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेला…”; दिव्या खोसलाने करण जोहरला सुनावले





