आमदाराच्या लेकीचा घायाळ करणारा अंदाज एकदा पाहाच; ‘त्या’ कारणाने कायम असते चर्चेत !

आम्ही बोलत आहोत, अभिनेत्री ‘नेहा शर्मा आणि तिची बहीण अभिनेत्री बहीण आयशा शर्मा’ बद्दल. या दोन्ही बहिणी बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्री असून सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात. नुकतंच अभिनेत्री नेहा शर्माने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा दिलखेच आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, नेहा कायम तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. तिला अनेकदा जीम बाहेर देखील स्पॉट करण्यात आलं आहे. अनेक सेलिब्रिटी देखील तिच्या फिटनेसवर फिदा आहे. वरुण धवन आणि अनिल कपूर यांसारखे सेलिब्रिटी नेहाच्या फिटनेसचं कौतुक करताना दिसतात. तिच्या जिमच्या फोटो आणि व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा कायमच भडीमार होत असतो.
नेहाचं बॉलिवूड करिअर….
नेहाने 2007 साली एका तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने 2010 मध्ये क्रुक चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती जयंतभाई की लव्ह स्टोरी, यमला पगला दीवाना 2, यंगिस्तान, मुबारकान, तानाजी यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. लवकरच तिचा जोगिरा सा रा रा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कोण आहेत नेहा शर्मा हिचे वडील?
नेहा शर्मा हिचे वडील काँग्रेस नेते आणि भागलपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. यावेळी नेहानेही वडिलांसोबत निवडणूक प्रचारात भाग घेतला होता. अभिनेत्रीच्या वडिलांनीही लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावलं होतं, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. अजित शर्मा यांनी भागलपूर मतदारसंघातून तीनदा निवडणूक जिंकली आहे.





