रेस्टॉरंट आणि बार उघडे ठेवण्याच्या वेळेत बदल; जाणून घ्या नव्या वेळा…
Updated On:

मुंबई – राज्य सरकाने रेस्टॉरंट आणि बार उघडायला परवानगी दिल्यानंतर ग्राहकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. ग्राहक आणि हॉटेल मालकांच्या विनंतीनंतर सरकारने आता हॉटेल, रेस्टॉरंटआणि बार उघडे ठेवण्याच्या वेळांमध्ये वाढ केली आहे.
आधी सकाळी 8 ते सायंकाळ 7 अशी वेळ होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे. आता सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहणार आहेत.
महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन याबाबत अंतिम निर्णय घ्यावा, असेही राज्य सरकारने म्हटले आहे. हॉटेल मालकांनी आणि ग्राहकांनी काय काळजी घ्यावी याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सरकारने याआधीच जारी केल्या आहेत.
रेस्टॉरंट आणि बारच्या वेळा वाढवाव्यात, अशी मागणी संबधित व्यवसायिक संघटनांची होती त्यानुसार सरकारने नवा आदेश काढला आहे.





