Satara Earthquake : साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के; पाच किलोमीटर खोलीवर केंद्र
Satara Earthquake : किरकोळ हादरा, मोठ्या नुकसानीची माहिती नाही

सातारा – जिल्ह्यात आज पहाटे ३ वाजून २९ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या नोंदीनुसार या भूकंपाची तीव्रता 2.4 रिश्टर इतकी होती. भूकंपाचे केंद्र सातारा जिल्ह्यात असून ते 17.373 अंश उत्तर अक्षांश आणि 73.769 अंश पूर्व रेखांशावर नोंदविण्यात आले आहे.
या भूकंपाची खोली जमिनीखाली सुमारे 5 किलोमीटर होती. पहाटेच्या वेळी भूकंपाची नोंद झाल्याने काही नागरिकांना परिसरात सौम्य हादरे जाणवल्याची शक्यता आहे. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी अथवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने त्याचा परिणाम मर्यादित राहिला.
जिल्ह्यात यापूर्वीही अधूनमधून सौम्य स्वरूपाचे भूकंप नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या संकेतस्थळावर तसेच ‘भूकंप’ ॲपवर या भूकंपाची नोंद उपलब्ध करण्यात आली आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
हेही वाचा:
Blood Sugar: गोड खाल्ल्यावर लगेच झोप का येते? कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का!





