Jordan Henderson Injury : इंग्लंड संघाला मोठा धक्का! विजयाचा जल्लोष करताना स्टार खेळाडूचा हात फ्रॅक्चर; थेट क्वार्टर फायनलमधून बाहेर
Jordan Henderson Injury : इंग्लंड संघाने अखेर वेग पकडला असून क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. मात्र,अत्यंत महत्त्वाच्या सामन्यापूर्वी इंग्लंड संघाला एक मोठा धक्का बसला आहे.

Jordan Henderson Hand Fracture Injury ahead England vs Norway Quarter Final : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ मध्ये संथ सुरुवातीनंतर कर्णधार हॅरी केनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने अखेर वेग पकडला असून क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. अंतिम ८ मध्ये इंग्लंडचा सामना नॉर्वेविरुद्ध होणार आहे. मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यापूर्वी इंग्लंड संघाला एक मोठा धक्का बसला आहे.
संघाचा अनुभवी मिडफिल्डर जॉर्डन हेंडरसन हात फ्रॅक्चर झाल्यामुळे या सामन्यातून बाहेर पडला आहे. ‘राऊंड ऑफ १६’ मधील विजयाचा जल्लोष साजरा करताना झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे ३६ वर्षीय हेंडरसनसोबत हा भीषण अपघात घडला.
जाहिरात बोर्डावरून उडी मारताना घडली दुर्घटना –
🚨🏴 JORDAN HENDERSON FORFAIT POUR LA FIN DE LA COUPE DU MONDE ! 🤯
Le milieu anglais va devoir subir une opération après s’être blessé au poignet lors de la célébration de la victoire de l’Angleterre. 🏆
Il est donc contraint de manquer le reste de la compétition. ❌…
— Instant Foot ⚽️ (@lnstantFoot) July 6, 2026
🚨⚽️ JORDAN HENDERSON didn’t touch the ball once, didn’t play a single minute of that game,
Yet somehow he managed to get a yellow card, a tournament ending injury and carried off on a stretcher 🤦🏻♀️#MEXENG #WorldCup #England
pic.twitter.com/u8VrniReVG— Gracie💙 (@Gracie_Blue89) July 6, 2026
विश्वचषकाच्या गेल्या फेरीत इंग्लंडने यजमान मेक्सिकोचा ३-२ असा पराभव करत क्वार्टर फायनलचे तिकीट पक्के केले होते. हा विजय ऐतिहासिक असल्याने सर्व खेळाडू मैदानावरील खेळपट्टी पार करून स्टेडियममधील चाहत्यांसोबत जल्लोष करण्यासाठी गेले होते. सेलिब्रेशन संपवून परतत असताना, जॉर्डन हेंडरसनने मैदानावरील डिजिटल ॲडव्हर्टायझिंग बोर्डावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात त्याचा तोल गेला आणि तो थेट तोंडावर आपटला. पडताना त्याचा डावा हात पूर्णपणे पिरगळला आणि तो वेदनेने ओरडू लागला. वैद्यकीय पथकाने तातडीने मैदानात धाव घेत त्याला स्ट्रेचरवरून बाहेर नेले.
शस्त्रक्रिया यशस्वी, पण पुनरागमन कठीण –
मेक्सिको सिटी येथील स्थानिक रुग्णालयात हेंडरसनच्या हाताचा एक्स-रे काढण्यात आला, ज्यामध्ये गंभीर फ्रॅक्चर असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्या हातावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. हेंडरसनने हॉस्पिटलच्या बेडवरून सोशल मीडियावर स्वतःचा फोटो शेअर करत शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती दिली. तो सध्या मेक्सिकोमधून अमेरिकेतील कॅन्सस सिटी येथे असलेल्या इंग्लंडच्या मुख्य कॅम्पमध्ये परतला आहे. परंतु, वैद्यकीय अहवालानुसार तो नॉर्वेविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात खेळू शकणार नाही. इतकेच नव्हे तर इंग्लंड संघ सेमीफायनलमध्ये पोहोचल्यास तिथेही त्याचे खेळणे कठीण मानले जात आहे.






