Tehran: जॉन अब्राहमचा ‘तेहरान’ येतोय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला; कथा ठरणार केंद्रबिंदू !

Tehran: जॉन अब्राहम याचा प्रमुख भूमिका असलेला थरारक चित्रपट ‘तेहरान’ स्वतंत्रता दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. देशभक्ती, गुप्तहेर कारवाया आणि जटिल प्रश्नांचा संगम असलेला हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.
फिल्मच्या रिलीजपूर्वी OTT प्लॅटफॉर्मच्या हिंदी कंटेंट हेड कावेरी दास यांनी ‘तेहरान’च्या विषयवस्तूवर भाष्य करत म्हटलं की, “आजची प्रेक्षकवर्ग सत्यकथांना महत्त्व देतो आहे आणि कथा हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे.”
कावेरी दास म्हणाल्या, “आम्ही अशा कथा सादर करू इच्छितो ज्या केवळ टाइमपास न राहता विचार करायला लावणाऱ्या आणि वास्तवाशी जोडलेल्या असाव्यात. ‘तेहरान’ हा एक जिओ-पॉलिटिकल थ्रिलर आहे ज्यामध्ये अशा लोकांच्या कथा आहेत जे देशासाठी बलिदान देतात.”
त्यांनी स्पष्ट केलं की, हिंदी कंटेंटची आखणी करताना त्यांचा मुख्य भर “मजबूत आणि सच्च्या कथानकावर” असतो. “जर कथा कमकुवत असेल, तर स्टारकास्ट किंवा ग्लॅमर काहीही कामाचं राहत नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
जॉन अब्राहम, मानुषी छिल्लर, मधुरिमा तुली आणि अभिजीत लाहिरी यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून त्यात जॉन एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत जबरदस्त अॅक्शन करताना दिसतो.
ट्रेलरमध्ये एका संवादाद्वारे कथानकाची झलक मिळते. “हे इंटरनॅशनल मॅटर आहे. तीन देशांमध्ये ब्लास्ट झाला आहे… हे अतिरेक्यांचं काम आहे. त्यांना बेनकाब करावं लागेल. राजीव कुमार कुठे आहे?” अशा संवादांमुळे प्रेक्षकांच्या उत्कंठेला अधिकच चालना मिळाली आहे.
कावेरी दास पुढे म्हणतात, “आजच्या प्रेक्षकाला केवळ चेहऱ्यांपेक्षा कथा अधिक महत्त्वाची वाटते. तो भावनात्मक पातळीवर जोडला जातो तेव्हा ते फक्त अभिनयामुळे नाही, तर कथेमधील सच्चेपणामुळे असते.”
‘तेहरान’ ही एक अस्सल भावना आणि विचार घेऊन आलेली कथा असून, स्वतंत्रतेच्या दिवशी देशभक्तीचा वेगळा अनुभव देणार, असा विश्वास निर्मात्यांना आहे.





