जॉन अब्राहमने खरेदी केली आलिशान कार; किती आहे किंमत?

John Abraham New Car | बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम अभिनयासह त्याच्या हटके लुकमुळे चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची मोठी पसंती मिळते. परंतु सध्या जॉन अब्राहम त्याच्या चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच जॉनने नवी कोरी आलिशान कार खरेदी केली आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जॉन अब्राहमने ‘महिंद्रा थार रॉक्स’ ही गाडी खरेदी केली आहे. जॉन अब्राहमसाठी कस्टमाइज्ड ब्लॅक थार रॉक्स डिझाइन करण्यात आली आहे. यात त्याने टॉप-स्पेक AX7 L मॉडेल विकत घेतले आहे. डॅशबोर्डवर ‘मेड फॉर जॉन अब्राहम’ असे देखील लिहिण्यात आले आहे. John Abraham New Car |
View this post on Instagram
मीडिया रिपोर्टनुसार, जॉन अब्राहमच्या नवीन कोऱ्या कारची महिंद्रा थार रॉक्सची किंमत जवळपास 12.99 लाख ते 23.09 लाख रुपये इतकी आहे. जॉन अब्राहमने आपली नवीन कार कस्टमाइज केली आहे. सीटच्या हेडरेस्टवर पिवळ्या रंगात ‘JA’ ही सिग्नेचर दिसत आहे. जॉन अब्राहमकडे याआधी लेम्बोर्गिनी गॅलार्डो आलिशान कार आहे. John Abraham New Car |
दरम्यान, जॉन अब्राहमचा ‘द डिप्लोमॅट’ हा चित्रपट 14 मार्च रोजी होळीच्या निमित्ताने प्रदर्शित झाला. जॉन व्यतिरिक्त सादिया खातिब, कुमुद मिश्रा, शारीब हश्मी, रेवती यासारख्या कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
हेही वाचा :





