पार्टीला जाण्याच्या नादात बाळाला कारमध्येचं विसरले ! नशेबाज पालकांमुळे बाळाला प्राण गमवावे लागले

नवी दिल्ली – पार्टी हा तरुणाईसोबत सर्वांच्याच आवडीचा विषय असतो. अनेकदा पार्टीच्या नादात घाई करण्याचा मोठा फटका देखील एखाद्या व्यक्तीला सहन करावा लागत असतो.सध्या असाच एक प्रसंग समोर आला आहे. पार्टीच्या नादात रात्रभर कारमध्ये विसरलेल्या बाळाचा मृत्यू झाला आहे.
पार्टीच्या नादात कारमध्ये रात्रभर विसरलेल्या 18 महिन्यांच्या बाळाचा उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत कॅलिफोर्नियातील पोक कौंटीमध्ये ही अजब घडण घडली आहे. 4 जुलैच्या पार्टीमध्ये जाण्यासाठी गेलेले कुटुंब आपल्या कारमध्ये आपल्या बाळाला विसरले होते. या प्रकरणी जोएल आणि जॅझमिन रोन्डोन नामक दाम्पत्यावर बाळाच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोन्डोन दाम्पत्य आपल्या 3 मुलांसह 4 जुलैला अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित पार्टीला गेले होते. यावेळी त्यांचे 18 महिन्यांचे बाळ कारमध्येच विसरून गेले होते. रात्री 3 वाजल्यापासून सकाळी 11 वाजेपर्यंत बाळ कारमध्येच राहिले होते.
यादरम्यान बाहेरील तापमान खूप वाढलेले. या उष्णतेमुळे बाळाचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. तपासणीनंतर रोन्डोन पती-पत्नी दोघेही अमली पदार्थांच्या आहारी गेले होते, असे निष्पन्न झाले आहे.





