Joe Root : जो रुटचे ऐतिहासिक शतक! भारताविरुद्ध ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू

Joe Root breaks Steve Smith record : इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने आपला शानदार फॉर्म कायम राखत मँचेस्टर कसोटीत शतक झळकावले. हे रूटच्या कारकिर्दीतील ३८वे शतक आहे. या खेळीच्या जोरावर रूटने कसोटी क्रिकेटमधील अनेक मोठे विक्रम मोडले. या मालिकेतील हे रूटचे दुसरे शतक आहे. रूटच्या शानदार खेळीच्या बळावर इंग्लंडने मँचेस्टर कसोटीत मोठी आघाडी मिळवली आहे. त्याबरोबर त्याने स्टीव्ह स्मिथचा मोठा विक्रमही मोडला आहे. यासह त्याने भारताविरुद्ध एक मोठा पराक्रम केला आहे.
जो रुटने भारताविरुद्ध रचला इतिहास –
जो रुटचे हे भारताविरुद्धचे ऐतिहासिक १२ वे कसोटी शतक आहे. या शतकासह तो भारताविरुद्ध सर्वाधिक शतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने हे शतक १७८ चेंडूत झळकावले. या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्टीव्ह स्मिथला मागे टाकले आहे. स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत भारताविरुद्ध कसोटीत ११ शतकं झळकावली आहेत. यासह तो एका संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतकं झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर डॉन ब्रॅडमन आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक १९ शतकं झळकावली आहेत.
Water is wet.
Joe Root has a hundred.🤝 @IGCom pic.twitter.com/GP5UknjIXA
— England Cricket (@englandcricket) July 25, 2025
एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतकं झळकावणारे खेळाडू:
- १९ – डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड
- १३ – सुनील गावस्कर (भारत) विरुद्ध वेस्ट इंडिज
- १२ – जॅक हॉब्स (इंग्लंड) विरुद्ध ऑस्ट्रेलिया
- १२ – स्टीव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड
- १२ – जो रूट (इंग्लंड) विरुद्ध भारत
हेही वाचा – IND vs ENG : अंशुल कंबोजच्या ‘त्या’ चुकीमुळे जडेजाची सटकली, पहिल्याच सामन्यात सुनावलं, पाहा VIDEO
जो रूटने शतकासह सर्वाधिक कसोटी शतक झळकावण्याच्या बाबतीत कुमार संगकाराची बरोबरी केली आहे. सर्वाधिक शतके झळकावण्याच्या यादीत जो रूट आता चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. या यादीत सचिन तेंडुलकर ५१ शतकांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. त्यानंतर जॅक कॅलिस (४५) दुसऱ्या आणि रिकी पॉन्टिंग (४१ ) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक कसोटी शतकं झळकावणारे फलंदाज:
- ५१ – सचिन तेंडुलकर
- ४५ – जॅक कॅलिस
- ४१ – रिकी पॉन्टिंग
- ३८ – जो रूट
- ३८ – कुमार संगकारा
- ३६ – राहुल द्रविड
- ३६ – स्टीव्हन स्मिथ





