ज्यो बायडेन पुढील आठवड्यापासून सुरू करणार प्रचार

वॉशिंग्टन – अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ज्यो बायडेन ठाम असून ते पुढील आठवड्यापासून आपला प्रचार सुरू करणार आहेत. बायडेन यांना कोविड-१९ ची लागण झाली असल्याने डेमोक्रॅटिक पक्षातून त्यांच्यावर माघारीसाठी येणारा दबाव आणखीन वाढला आहे.
कोविड-१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने बायडेन यांना डेनवार येथील निवासस्थानी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तेथे ते किमान आठवडाभर तरी राहण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे नेतृत्व अमेरिकेसाठी घातक आहे.डेमोक्रॅटिक पक्ष म्हणून आणि देश म्हणूनही आपण त्यांना पराभूतकरू शकतो, असे बायडेन यांनी शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
रिपब्लिकन पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र पुढील आठवड्यात आपण प्रचाराला पुन्हा सुरुवात करणार आहोत, असे बायडेन यांनी म्हटले आहे.
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणूकीत बायडेन ट्रम्प यांना पराभूत करू शकतील की नाही, यावर डेमोक्रॅटिक पक्षामध्ये मतभिन्नता आहे. पक्षातच या मुद्यावरून दोन गट पडले आहेत. शुक्रवारी किमान १० डेमोक्रॅट्सनी बायडेन यांना राजीनामा देण्याचे आवाहन केले.
त्यांना माघार घ्यावी, असे मत संसदेच्या माजी सभापती नॅन्सी पेलोसी आणि माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील खासगीमध्ये व्यक्त केले आहे. काही सदस्यांनी उघडपणे ही मागणी लावून धरली आहे.
बायडेन समर्थक नेत्यांना मात्र आपली बाजू सावरावी लागते आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाकडून बायडेन यांना अद्याप अधिकृतपणे उमेदवार घोषित केले गेलेले नाही. मात्र प्रथेप्रमाणे विद्यमान अध्यक्षच उमेदवार असतो.
ट्रम्प यांच्यावर टीका
ट्रम्प यांनी चर्चेदरम्या केवळ आपल्या स्वतःच्या चूकांवरच भाष्य केले होते. त्यांच्याजवळ भविष्याची कोणतीही योजना नाही. २०२५ च्या अजेंड्याबाबत काहीही बोलणे त्यांनी टाळले होते. ते केवळ मेक अमेरिका ग्रेट अगेन या कट्टरवादी भूमिकेवर बोलत असल्याची टीका बायडेन यांनी केली आहे.





