Jitendra Awhad : सहर शेखच्या ‘त्या’ विधानानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले ” इथे फक्त…”
Jitendra Awhad : AIMIM पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचले होते. आता आव्हाडांनी देखील जोरदार प्रत्युत्तर देत समाचार घेतला आहे.

Jitendra Awhad : गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा येथील जाहीर सभेतून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख त्यांनी केलेल्या विधानामुळे त्या टीकेच्या धनी बनल्या आहेत. यासोबतच त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचले होते.
‘पुढील पाच वर्षांत मुंब्रा हिरवा करून टाकू’ असे विधान सहर शेख यांनी केल्याने वादाला तोंड फुटले आहे. तसेच कैसा हराया असे म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना डिवचले होते. यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा येथे जाऊन पहिल्यांदाच यावर भाष्य केले आहे. मुंब्रा येथे केलेल्या भाषणात ‘मुंब्र्यात कोणताही एक रंग चालणार नाही, इथे फक्त आणि फक्त तिरंगाच चालेल’ अशा शब्दांत आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी भाषणात बोलताना सहर शेखच्या भाषणाची खिल्ली उडवली. आज आपली मुलं मोठ्या महाविद्यालयात शिकायला जातात ते अभिमानाने जातात. मुंब्र्याला तुलनेने चांगल्या सुविधा दिल्या आणि सुधारणा केली. चॉकलेट खिलाया… असं बोलत आमचे नवीन लोक माध्यमांसमोर जाणार नाहीत, या शब्दांत आव्हाडांनी नाव न घेता सहर शेखला टोला लगावला. सहर शेख ही लहाण मुलगी आहे, मी तिच्याकडे लक्ष देणार नाही, असे देखील ते म्हणाले.
कैसा हराया या सहर शेखच्या विधानावर जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य करत हारलोय याचा अर्थ थांबलोय असं नाही. पुढच्या पाच वर्षानंतरची लढाई आज सुरू झाली आहे असे सांगत पुन्हा त्याच जोमाने राजकीय आखाड्यात लढणार असल्याचे सूतावोच दिले. सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांना मुंब्र्यात येऊन दाखव, तुझे हात-पाय मोडतो असे म्हणत धमकी दिली होती. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले धमकी देणाऱ्यांना मी जर बोलायला लागलो तर भलेभले तुरुंगात जातील, त्यामुळे धमकीची भाषा चालणार नाही.

सहर शेख हिने जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करण्यात आली. या टीकेला उत्तर देताना मला किती जरी उकसवायचा प्रयत्न केला तरी काही फरक पडत नाही. हे जग प्रेमाने जिंकलं जाते आणि पुढेही जाईल, असे आव्हाडांनी सांगिंतले. “माझ्यावर टीका करणाऱ्यांबद्दल माझ्या मनात कधीही तिरस्कार असणार नाही. या शहराने मला प्रेम दिलं आणि मीही शहराला प्रेम परत देणार. २००९ साली हे शहर मला ओळखत नव्हतं, त्यावेळीही माझ्यावर प्रेम केलं, त्यांनी मला निवडून दिलं. माझं नातं हे माणुसकीशी आहे, हेच आमचं नातं आहे.
हेही वाचा : India-EU FTA: कापड उद्योगाला मोठा दिलासा; युरोपात 0% शुल्कावर निर्यातीची संधी





