India-EU FTA: भारत आणि युरोपियन समुदायादरम्यान मुक्त व्यापार करार लवकरच होणार आहे. अशा परिस्थितीत भारतातील कापड व तयार कपडे निर्माण करणार्याना युरोपातील मोठी बाजारपेठ कमी आयात शुल्कावर उपलब्ध होणार आहे. यामुळे भारतातील कापड उत्पादकांनी या कराराचे स्वागत केले आहे. भारतातील कापड व तयार कपड्यांना युरोपात आता 0% आयात शुल्क लागेल. अशा परिस्थितीत भारत हा बांगलादेश आणि व्हिएतनाममधील कापड उत्पादकांची स्पर्धा करू शकणार आहे. सध्या भारतातील कापड उद्योगासाठी युरोप ही अमेरिकेनंतर दुसर्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. या करारानंतर युरोपला आणखी कापड निर्यात होऊ शकेल. सध्या भारतातल्या एकूण कापड निर्यातीपैकी 28% कापड अमेरिकेला निर्यात होते. कापड निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष ए शक्तिवेल यांनी सांगितले की, या करारामुळे भारतीय कापडाची युरोपला मोठ्या प्रमाणात निर्यात होईल. भारतात या क्षेत्रात रोजगार निर्माण होण्यास मदत होईल. अमेरिकेने भारतातील कापडा विरोधात 50 टक्के आयातशुल्क लावल्यानंतर या क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र आता या करारामुळे ही अस्वस्थता बर्याच प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे. सध्या भारतीय कापडाची निर्यात युरोपला वार्षिक पातळीवर तीन टक्क्यांनी वाढते. आता ही निर्यात 20 ते 25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. 2024- 25 या आर्थिक वर्षात युरोपियन समुदायाने 202 अब्ज डॉलरचे कापड आयात केले. ही बाजारपेठ सर्वात मोठे आहे. सरलेल्या वर्षात भारताने 38 अब्जे डॉलर्सचे कापड निर्यात केले होते.