BIS’s new standards: भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) स्वीकारलेल्या आयएस 19469:2025 या मानकाचे नॅचरल डायमंड कौन्सिल (एनडीसी) स्वागत करत आहे. हे मानक हिर्यांसाठी स्पष्ट आणि अंमलबजावणीयोग्य संज्ञात्मक चौकट निश्चित करण्यात आली आहे. या मानकाद्वारे नैसर्गिक हिरे आणि प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले हिरे यांच्यात ठोस फरक स्पष्ट करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्राहक संरक्षण अधिक बळकट होणार असून, भारतीय हिर्यांच्या दागिन्यांच्या बाजारात पारदर्शकतेला चालना मिळेल. ‘हिरा’ (डायमंड) हा शब्द कोणत्याही विशेषणांशिवाय वापरला असल्यास तो केवळ नैसर्गिक हिर्यांसाठीच (नॅचरल डायमंड) लागू राहील. विक्रेत्यांना ‘नैसर्गिक’ (नॅचरल), ‘रिअल’, ‘जेन्युइन’ (अस्सल) किंवा ‘प्रेशस’ (मौल्यवान) अशी विशेषणे वापरण्याची मुभा असेल. मानवनिर्मित पर्यायांबाबत नेहमीच स्पष्ट माहिती देणे बंधनकारक असून त्यासाठी फक्त ‘लॅबोरेटरी ग्रोन डायमंड (प्रयोगशाळेत वाढवलेला हिरा)’ किंवा ‘लॅबोरेटरी-क्रिएटेड डायमंड (प्रयोगशाळेत तयार केलेला हिरा)’ या पूर्ण संज्ञाच वापराव्या लागतील. औपचारिक खुलाशामध्ये ‘एलजीडी’, ‘लॅब ग्रोन’ किंवा ‘लॅब-डायमंड’ यांसारख्या संक्षिप्त संज्ञांचा वापर करण्यास आता परवानगी नसेल. नॅचरल डायमंड कौन्सिलच्या व्यवस्थापकीय संचालक रिचा सिंग म्हणाल्या, या मानकामुळे ग्राहकांसाठी दीर्घकाळापासून अपेक्षित असलेली स्पष्टता मिळाली आहे.