Jitendra Awhad गाडी हल्ला प्रकरण: संजय राऊत म्हणतात, “राज्यात दिल्ली व गुजरात मधून दहशत माजवण्याचा प्रयत्न”

Jitendra Awhad | Sanjay Raut – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे, हल्ल्या प्रकरणी डोंगरी पोलिसांनी नवी मुंबईतून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव आणि अंकरीश कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
एक आमदार सत्ताधारी पक्षाचा आणि दुसरा आमदार जितेंद्र आव्हाड, जो विरोधी पक्षाचा आहे, दोघांवर हल्ला झाला. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे?… महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे आणि ते कायद्यासाठी ओळखले जाते.
उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीत राज्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत होती, असे ते म्हणाले. राज्यात दहशतीचे राजकारण केले जात आहे, आणि त्याचे नियंत्रण दिल्ली आणि गुजरातमधून केले जात आहे, त्याची किंमत आम्ही चुकवत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.





