जियो रे बाहुबली.! बॉक्स ऑफिसवर पुन्हा धुमाकूळ घालणार ‘बाहुबली’; ‘या’ दिवशी रुपेरी पडद्यावर झळकणार

Baahubali: The Beginning : साऊथ सुपरस्टार अभिनेता प्रभासच्या ‘बाहुबली – द बिगिनिंग’ चित्रपटाबद्दल महत्वाची बातमी समोर आली आहे. चित्रपट निर्माते ‘बाहुबली’च्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त हा सिनेमा चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित करणार आहेत.
चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही, परंतु बॉलिवूड वर्तुळात अशी चर्चा आहे की एस.एस. राजामौलीचा हा चित्रपट 10 जुलै 2025 रोजी थिएटरमध्ये पुन्हा भव्य शैलीत प्रदर्शित होईल.
हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांकडून त्याला प्रचंड प्रेम मिळाले त्यानंतर ‘बाहुबली – द कन्क्लुजन’ ने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले. सगळीकडे फक्त याच सिनेमाची चर्चा रंगली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त त्याचे पुन्हा प्रदर्शन जवळजवळ निश्चित झाले आहे. राजामौलीचा हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरला ज्याने दक्षिण चित्रपटसृष्टीला एक नवीन उड्डाण दिले.
या चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या ज्यांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. पण प्रश्न असा आहे की, राजामौली, इतर अनेक चित्रपट निर्मात्यांप्रमाणे, ‘बाहुबली’च्या रिलीजसोबतच त्यांच्या नवीन सिक्वेलची घोषणा करतील? असं देखील बोललं जात आहे.
हा चित्रपट बनवताना, राजामौली आणि त्यांच्या टीमने अनेक नियम तोडले आणि चित्रपट समुदाय देखील त्यांच्या विरोधात गेला. पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर 650 कोटी रुपयांचा मोठा गल्ला जमवून सर्वांनाच थक्क केले.
या चित्रपटाने प्रभासला आंतरराष्ट्रीय स्टार बनवले, परंतु त्यानंतर प्रभासने अनेक चित्रपट केले, मात्र त्यांना बॉक्स ऑफिसवर पूर्वीसारखा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, प्रभास ‘सलार’ द्वारे तो जादू करण्यात यशस्वी झाला.
दरम्यान, ‘बाहुबली’ दोन भागांत रिलीज करण्यात आलेला चित्रपट, ‘बाहुबली : द बिगनिंग’ 2015 साली 10 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. तर याचा पुढचा पार्ट ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’ 28 एप्रिल, 2017 मध्ये रिलीज करण्यात आला होता.





