जिया शंकरने ट्रोल करणाऱ्याची केली बोलती बंद; म्हणाली “तू नरकात…”

Jiya Shankar | सोशल मीडियावर अनेक सेलेब्रिटींना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनेकदा काही सेलेब्रिटी ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तरही देतात. यातच आता बॉलिवूड अभिनेत्री जिया शंकरने देखील ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. सध्या तिने दिलेल्या या उत्तराचे अनेकांनी समर्थन केले आहे.
एका युजरने एक्स अकाऊंटवरुन जियाचा एक फोटो ट्वीट केला होता. या फोटोमध्ये जियाबरोबर इतर चार व्यक्ती दिसत होत्या. हा फोटो ट्वीट करत त्या युजरने “I hate my mind… नरकात जाण्याची वेळ आली आहे…”, असं म्हटलं होतं. हे ट्वीट पाहून जियाचा पारा चढला. या युजरला त्याच्याच भाषेत जियाने उत्तर दिलं आहे. “मला आशा आहे की तू नरकात सडशील”, असे थेट प्रत्युत्तर देत तिने ट्रोल करणाच्या बोलती बंद केली आहे.
“महिलांनी त्यांच्या सावळ्या मित्र, सहकारी आणि चाहत्यांबरोबर फोटो काढू नये का? तुमच्यासारख्या घाणरेड्या मानसिकतेचे लोक अशा घाणेरड्या वर्णभेदाच्या कमेंट करतात. मग तो एक साधा फोटो का असेना. आता मला कळतंय की आपल्या देशात पॉर्नवर बंदी का आहे? जे लोक या व्यक्तीला सपोर्ट करत आहेत आणि त्यावर हसत आहेत…तुम्हाला सुद्धा लाज वाटली पाहिजे”, असं म्हणत जियाने ट्रोलर्सला खडे बोल सुनावले आहेत. जियाच्या रिप्लायनंतर युजरने त्याचं ट्वीटच डिलीट केलं आहे. Jiya Shankar |
दरम्यान, जिया शंकरने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. रितेश देशमुखच्या ‘वेड’ सिनेमामुळे जिया प्रसिद्धी झोतात आली होती. व्हर्जिन भास्कर या वेब सीरिजमध्येही ती झळकली आहे. याशिवाय ती बिग बॉस ओटीटीवरही पाहायला मिळाली. Jiya Shankar |
हेही वाचा:
महिलांना पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचा अधिकार केव्हा मिळाला ?





