SMAT 2025 Title : झारखंडने रचला इतिहास! इशानच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर कोरलं नाव

Jharkhand Won SMAT 2025 Title : पुण्याच्या गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा सामना पार पडला. या सामन्यात इशान किशनच्या नेतृत्वाखाली झारखंडने हरियाणाचा ६९ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच या प्रतिष्ठेच्या चषकावर आपले नाव कोरले. झारखंडच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे हरियाणाचा संघ दबावाखाली पूर्णपणे विखुरलेला पाहायला मिळाला. झारंखडने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हरियाणाचा संघ १८.३ षटकांत १९३ धावांत गारद झाला.
इशान किशनने झळकावले शतक –
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या झारखंडने निर्धारित २० षटकांत ३ बाद २६२ धावांचा डोंगर उभा केला. झारखंडच्या डावाचा मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे कर्णधार इशान किशन. त्याने अवघ्या ४९ चेंडूत १० षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने १०१ धावांची धडाकेबाज शतकी खेळी केली. त्याला कुमार कुशाग्रने योग्य साथ देत ३८ चेंडूत ८१ धावा कुटल्या. डावाच्या अखेरच्या टप्प्यात अनुकूल रॉय (नाबाद ४०) आणि रॉबिन मिन्झ (नाबाद ३१) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे झारखंडने टी-२० क्रिकेटमधील एक विशाल धावसंख्या उभारली.
धावांच्या आव्हानाखाली हरियाणाचा डाव कोसळला –
Moments to cherish 🤗
Jharkhand Captain Ishan Kishan receives the coveted Trophy from BCCI Hon. Treasurer Mr. A. Raghuram Bhat 🏆👏
Scorecard ▶️ https://t.co/3fGWDCTjoo#SMAT | @IDFCFIRSTBank | @ishankishan51 pic.twitter.com/KoEhrdwPB3
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 18, 2025
२६३ धावांच्या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करताना हरियाणाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. या स्पर्धेत फॉर्मात असलेला हरियाणाचा कर्णधार अंकित कुमार आणि आशिष सिवाच हे दोघेही खातं न उघडताच (डक) बाद झाले. अर्श रंगा आणि यशवर्धन दलाल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अर्श रंगा १७ धावांवर सुशांत मिश्राच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.
हेही वाचा – IND vs PAK : क्रीडा विश्वात खळबळ! पाकचा खेळाडू भारताकडून खेळला अन् फडकवला तिरंगा, पाकिस्तान महासंघ संतापला
पहिल्या ६ षटकांत हरियाणाने ५८ धावा केल्या होत्या, पण ३ महत्त्वाचे गडी गमावल्यामुळे ते बॅकफूटवर गेले. निशांत सिंधू (३१ धावा) आणि यशवर्धन दलाल यांनी चौथ्या गड्यासाठी ६७ धावांची भागीदारी करून झुंज दिली. मात्र, निशांत बाद होताच हरियाणाच्या उरलेल्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. हरियाणाचा संपूर्ण संघ १८.२ षटकांत १९३ धावांवर गारद झाला.
हेही वाचा – Ishan Kishan Century : इशानने SMAT फायनलमध्ये झळकावले वादळी शतक! हरियाणाच्या गोलंदाजांची उडाली दाणादाण
झारखंडची प्रभावी गोलंदाजी –
झारखंडच्या विजयात गोलंदाजांचाही मोठा वाटा राहिला. सुशांत मिश्रा आणि बाल कृष्णा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत हरियाणाचे कंबरडे मोडले. तर विकाश सिंग आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर झारखंडने प्रथमच सैयद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून नवा इतिहास रचला आहे.





