Jharkhand News : झारखंड पोलिसांसमोर 16 माओवाद्यांचे आत्मसमर्पण
झारखंडमध्ये सुरक्षा दल आणि पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे नक्षलवादाला (Jharkhand News) मोठे खिंडार पडले आहे. मंगळवारी झारखंड पोलिसांसमोर तब्बल १६ माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात प्रवेश केला.

Jharkhand News : झारखंडमध्ये सुरक्षा दल आणि पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे नक्षलवादाला (Jharkhand News) मोठे खिंडार पडले आहे. मंगळवारी झारखंड पोलिसांसमोर तब्बल १६ माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात प्रवेश केला. यामध्ये ज्यांच्यावर राज्य शासनाकडून एकूण ३९ लाख रुपयांचे घसघशीत बक्षीस जाहीर करण्यात आले होते, अशा सहा जणांचा समावेश आहे.
या मोठ्या गटात पाच महिला सदस्यांचाही (Jharkhand News) समावेश असून, यात प्रादेशिक समिती आणि विभागीय समितीच्या उच्चपदस्थ नक्षलवाद्यांचा समावेश आहे. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) संघटनेचा प्रादेशिक समिती सदस्य संतोष महतो (उर्फ वासुदेव दा) याच्यावर १५ लाखांचे बक्षीस होते आणि तो तब्बल १२८ गुन्ह्यांमध्ये हवा होता. तसेच १० लाखांचे बक्षीस असलेला आणि ७८ गुन्ह्यांत हवा असलेला विभागीय समिती सदस्य चंदन लोहरा यानेही टाकले.
याशिवाय उप-विभागीय व क्षेत्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही आत्मसमर्पण (Jharkhand News) केले. या नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर मोठी शस्त्रे व गोलाबारूद सादर केले असून, यामध्ये ६ इन्सास, २ एके-४७ रायफल्ससह एकूण ११ आधुनिक शस्त्रे, ३८ मॅगझिन्स आणि १,५६२ जिवंत काडतुसांचा समावेश आहे. पोलिसांच्या या कारवाईला नक्षलवादी चळवळीला बसलेला एक मोठा धक्का मानले जात आहे.






