प्रभात वृत्तसेवा पुणे – जेजुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम रणधुमाळीमध्ये प्रत्येक पक्षाचे उमेदवार घरोघरी मतदारांची गाठीभेटी घेत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेमुळे आणि त्यामधील त्यांनी जेजुरी स्मार्ट सिटी बनवणार पाणी पुरवठा सर्व प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सोन्याची जेजुरी सोन्याची करणार, या संबंधित दिलेला शब्द कारण अजित पवार शब्दाचा पक्का आहे.त्यामुळे जेजुरीतील प्रचारादरम्यान मतदारांच्या गाठीभेटीला भेटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. मतदारांची गाठीभेटी घेत असताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई हे जेजुरीचा विकास एकाच पावसात कसा वाहून गेला. माझ्या मल्हार मार्तंड नगरीत येळकोट येळकोट जय मल्हार, सोन्याची जेजुरीचा बोर्ड न लावता आय लव यू जेजुरी असल्या प्रकारचे 60 ते 70 हजार रुपयांच्या बोर्डसाठी सहा ते सहा लाख रुपये खर्च सत्ताधाऱ्यांनी करण्यात आल्याचे सांगितले. याबरोबर पाणी प्रश्न, घनकचऱ्याचा प्रश्न, रस्ते पथदिवे स्वच्छता या संबंधित झालेला भ्रष्टाचारावर जयदीप बारभाई आणि त्यांच्या पॅनलचे उमेदवार त्या ठिकाणी मतदारांना भेटीदरम्यान कसा झालाय हे स्पष्ट करीत आहेत. त्याचबरोबर मतदारांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेत आहेत आणि त्यावर नक्की तोडगा काढला जाईल, अशी आश्वासन देत आहेत. त्यांच्या संपूर्ण सर्व एक ते दहा प्रभागांमधील मतदारांच्या भेटीगाठीची दुसरी फेरी पूर्ण झाली असून मतदारांमध्ये आणि उमेदवारांमध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. पूर्ण पॅनलचे वाॅर्डा,वाॅर्डात स्वागत प्रत्येक वार्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत असताना दिसत आहे. प्रचाराच्या भेटीगाठी दरम्यान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई आणि त्यांच्या सर्व पॅनलच्या उमेदवारांचे औक्षण केले जात आहे आणि त्यांच्याबद्दल अतिशय आदर व्यक्त केला जात आहे.