जेईईच्या मुख्य परीक्षेचा निकाल घोषित! ४४ उमेदवारांना १०० टक्के गुण; १८ उमेदवारांना टॉप रँक

नवी दिल्ली : बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असणाऱ्या इंजिनिअरिंगची प्रवेश परीक्षा जेईई-मेनच्या चौथ्या सत्राचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण ४४ उमेदवारांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर १८ उमेदवारांना टॉप रँक मिळाला आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधी अधिकृत माहिती दिली आहे.
विद्यार्थ्यांना आपली गुणसंख्या सुधारण्याची संधी मिळावी यासाठी यावर्षी जेईई-मेनची परीक्षा वर्षातून चार वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिले सत्र फेब्रुवारी आणि दुसरे मार्च महिन्यात आयोजित करण्यात आले होते.
पुढील सत्राच्या परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात होणार होत्या. मात्र देशात करोनाची दुसरी लाट आल्याने त्या स्थगित करण्यात आल्या होता. तिसरं सत्र २०-२५ जुलैला आयोजित करण्यात आलं होतं, तर चौथं सत्र २६ ऑगस्टपासून २ डिसेंबरपर्यंत आयोजित होते.
असा पहा निकाल –
१ – अधिकृत वेसबाईट jeemain.nta.nic.in किंवा ntaresults.nic.in ओपन करा
२ – होम पेजवर ‘JEE Main 2021 session 4 results’ लिंकवर क्लि करा
३ – तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सेक्यूरिट कोड भरा
४ – माहिती भरल्यानंतर सबमिट करा
५ – चौथ्या सत्रासाठी जेईई मेनचा निकाल समोर येईल
६ – तुमचा निकाल डाऊनलोड करा आणि पुढील गोष्टींसाठी त्याची प्रिंट आऊट घ्या
* JEE Advanced साठी रजिस्ट्रेशन
जेईई मेन २०२१ चा निकाल घोषित झाल्यानंतर जेईई अॅडव्हान्ससाठी (JEE Advanced 2021) रजिस्ट्रेशन सुरु होईल. जेईई मेन कट ऑफमध्ये टॉप रँक मिळवणारे अडीच लाख उमेदवार जेईई अॅडव्हान्ससाठी अर्ज करु शकतात. उमेदवार अधिकृत वेबसाईट jeeadv.ac.in वर जाऊन जेईई अॅडव्हान्स २०२१ साठीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करु शकतात.
* JEE Advanced परीक्षा कधी ?
२३ आयआयटीमध्ये बीटेक आणि युजी इंजिनिअरिंग प्रोग्राम कोर्समध्ये प्रवेश करण्यासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षा ३ ऑक्टोबर २०२१ ला घेतली जाणार आहे.
या वेबसाईट्सवर चेक करु शकता जेईई मेन निकाल २०२१
nta.ac.in,
ntaresults.nic.in,
jeemain.nta.nic.in




