satara | जयरामस्वामी विद्यामंदिराचा दहावीचा निकाल 98.56 टक्के
Updated On:

पुसेसावळी, (प्रतिनिधी) – जयरामस्वामींचे वडगाव येथील जयरामस्वामी विद्यामंदिर व ज्युनिअर काॅलेजचा शालांत परीक्षेचा निकाल 98.56 टक्के इतका लागला आहे. शाळेच्या आजवरच्या इतिहासात 99.40 टक्के गुण मिळवून जान्हवी दादासो पवार हिने शाळेचा नावलौकीक वाढवला आहे.
17 विद्यार्थ्यांनी 90टक्के पेक्षा जास्त,12 विद्यार्थ्यांनी 85टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. जान्हवी दादासो पवार हीने 99.40 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला.
तर अभिलाषा सिद्धनाथ राऊत 98.20 टक्के गुण मिळवून द्वितीय,तर सोहम शंकर देशमाने याने 98 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पालक, ग्रामस्थ व अधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी व संस्थेचे अभिनंदन केले.





