Ishwarpur News : टेबलावर वजन ठेवल्याशिवाय वाळवा तहसील कार्यालयात काम होत नाही : आमदार जयंत पाटील
Ishwarpur News : सुजाण तालुक्याला गृहीत धरून कोणीही काम करू नये; नंतर 'पुन्हा सांगितले नाही' असे म्हणू नका!" अशा अत्यंत आक्रमक शब्दांत माजी अर्थमंत्री व आमदार जयंत पाटील यांनी भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाहीर इशारा दिला आहे.

Ishwarpur News : वाळवा तालुक्यात भ्रष्टाचार खपवून घेतला जात नाही, अधिकारी पारदर्शक काम करणारे असावेत. पण हल्ली वाळवे तहसील कार्यालयात टेबलावर वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही. (Ishwarpur News)
या तालुक्याला गृहीत धरून कोण काम करू नये, कारण हा सुजाण जनतेचा तालुका आहे. पुन्हा सांगितलं नायं असे म्हणू नका, अशा शब्दांत माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. (Ishwarpur News)
ईश्वरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व अभियानाच्या कार्यक्रमप्रसंगी आमदार जयंत पाटील बोलत होते. (Ishwarpur News)
या कार्यक्रमास माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार भगवानराव साळुंखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, हुतात्मा संकुलाचे नेते गौरव नायकवडी, जिल्हा परिषद सदस्य जयराज पाटील, अभिजित पाटील, सागर खोत, ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार सारिका रासकर, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. (Ishwarpur News)
या शिबिरामध्ये तालुक्यातील अपंग, वंचित, निराधार नागरिक तसेच महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित कामांचा आढावा घेऊन अनेक प्रश्नांचे जागेवरच निराकरण करण्यात आले. शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक त्या सेवा, सुविधा आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. (Ishwarpur News)
माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी हल्ली सुरू असलेल्या वाळवा तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराविषयीच उघड जाहीरपणे इशारा दिल्यामुळे शासकीय यंत्रणेत आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. (Ishwarpur News)





