jayant patil- महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नेता कुठल्या पक्षाशी हाथ मिळवणी करून शपथ विधी घेऊल याचा नेम नाही. गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत मुख्यमंत्री पदाची शपथविधी घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र राजकीय वर्तुळात भावी मुख्यमंत्री होणार असल्याचे बॅनर नेहमीच चर्चात येतात. अशात आता पुण्यात मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याऐवजी जयंत पाटील यांना भावी मुख्यमंत्री म्हटले गेले आहे.
हेही वाचा
Shah Rukh Khan । शाहरुख खान म्हणाला- ‘मी लीजंड नाही, मी बाँड आहे… जेम्स बाँड’
लवकरच लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. अनेक कार्यकर्ते आपल्या नेत्यांना भावी मुख्यमंत्री करत आहे. पुण्यात जयंत पाटील यांचे बॅनर लागले आहे. जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भावी मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख केला आहे. जयंत पाटील, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो बॅनर्सवर आहेत. शरद पवार गटाचे पदाधिकारी विकास चव्हाण यांनी हे बॅनर्स लावले आहे.
राज्यात ठिकठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. त्यावेळी आपआपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी भावी मुख्यमंत्री करण्याची स्पर्धा लागली असते. विधानसभा निवडणुक सप्टेंबर महिन्यात होणार आहे. तरीही आतापासून नेत्यांचे कार्यकर्ते भावी मुख्यमंत्रीपदाची चर्चा करत आहे. या बॅनर्समुळे चर्चा मात्र होत असते.
हेही वाचा
Farmer Protest | बच्चू कडू संतापले,’मोदी सरकार सपशेल अपयशी ठरलं..’