Jayant Patil : कदाचित भाजपला मुंबईत आणखी लोकांची गरज; फडणवीस- राज ठाकरे भेटीवर जयंत पाटलांचा टोला

मुंबई : भारतील जनता पक्षाला मुंबईत आणखी मदतीची गरज आहे, असे दिसून येत आहे. म्हणून ते इतर पक्षांसोबत संपर्क साधत असून हॉटेलमध्ये भेटी घेत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
पाटील पुढे म्हणाले की, रश्मी ठाकरेंच्या हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली असे म्हणता येणार नाही. आम्ही संपूर्ण ठाकरे कुटुंबियांना जवळून पाहिजे आहे, आम्हाला असे काही वाटत नाही. आगामी निवडणूक आम्ही आमच्या विचाराच्या मविआतील पक्षासोबत लढवू असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
मुंबई पालिकेच्या 92 हजार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. या ठेवी आता रिकाम्या होऊ लागल्या आहेत. 2 लाख 36 कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर दिल्या आहेत मात्र यांच्याकडे द्यायला पैसा नाही. असलेल्या ठेवी मोडण्याची वेळ यांच्यावर आली आहे असे म्हणत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.





