जया बच्चन पुन्हा संतापल्या; बिग बींसोबतचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल

Jaya Bachchan Viral Video | ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या परखड वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्या पापाराझींवरही संताप व्यक्त करताना दिसले आहेत. यातच आता त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात त्या पुन्हा एकदा संतापलेल्या पाहायला मिळाल्या. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचा मुंबई एअरपोर्टवरील हा व्हिडिओ आहे.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन विमानतळावरून बाहेर पडताना पापाराझींनी टिपलेल्या व्हिडीओमध्ये गाडीत बसण्यापूर्वी जया बच्चन प्रचंड रागावलेल्या दिसत आहेत. पण, त्या कोणावर चिडल्या आहेत हे समजू शकले नाही. त्या स्टाफवर ओरडल्याचे म्हंटले जात आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये अभिनेत्री जया बच्चन या विमानतळावरुन आपल्या गाडीच्या दिशेन जात आहेत. मध्येच त्या थांबतात आणि तेवढ्यात कोणावर तरी ओरडतात. या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी ‘नेहमीचे आहे,’ ‘त्यात काय नवीन’, अशा कमेंट केल्या आहेत. Jaya Bachchan Viral Video |
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, त्या शेवटच्या करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये पाहायला मिळाल्या. यात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिका होती. Jaya Bachchan Viral Video |





