जय भानुशाली आणि माही विजचा झाला घटस्फोट? लग्नाच्या १४ वर्षांनंतर होणार वेगळे

Jay Bhanushali and Mahi Vij | अभिनेता जय भानुशाली आणि पत्नी माही विज वेगळे होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दोघांनी काही महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि त्या कागदपत्रांवर त्यांनी स्वाक्षरी देखील केली आहे. जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये त्यांचा घटस्फोट अंतिम झाला असल्याचे म्हंटले जात आहे. मुलांच्या कस्टडीवरही त्यांचा निर्णय झाला आहे. मात्र अद्याप दोघांनी घटस्फोटावर अधिकृत भाष्य केलेलं नाही.
अभिनेता जय भानुशाली आणि पत्नी माही विज यांचे २०११ मध्ये दोघांचं थाटात लग्न झालं. त्यांना २०१९ साली तारा ही गोंडस मुलगी झाली. लेकीबरोबरचे अनेक व्हिडिओ दोघं पोस्ट करत असतात. सोशल मीडियावर त्यांचे व्लॉग व्हायरल होत असतात. मात्र बऱ्याच काळापासून दोघांनी एकमेकांसोबत फोटो शेअर करणंही बंद केलं. जून २०२४ मध्ये दोघांची शेवटची पोस्ट होती.
१४ वर्षांचा संसार मोडला
दोघांचा एकमेकांवर विश्वास राहिला नसल्याचे त्यांच्या घटस्फोटाचं कारण आहे, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. याआधीही दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा झाल्या आहेत. मात्र यावर बोलणं तिने टाळलं होतं. जय आणि माही शेवटचे एकत्र ऑगस्टमध्ये ताराच्या वाढदिवसानिमित्त दिसले होते. Jay Bhanushali and Mahi Vij |
दरम्यान, जय आणि माहीला तारा ही मुलगी आहे. शिवाय दोघांनी दोन मुलांना दत्तकही घेतलं आहे. आता दोघांचा १४ वर्षांचा संसार मोडला असल्याची माहिती समोर येताच चाहत्यांही धक्का बसला आहे. Jay Bhanushali and Mahi Vij |
हेही वाचा:
Janhvi Kapoor: करण जोहर जान्हवी कपूर बद्दल का आहेत इतके प्रोटेक्टिव्ह? टॉक शोमध्ये केला मोठा खुलासा





