जवानांना कपडे, बूट, स्लिपींग बॅगचा तुडवडा; कॅगच्या अहवालातून उघड

सियाचिन, लडाख, डोकलाममध्ये सैनिक करतात कपडे आणि खाद्यपदार्थांसाठी संघर्ष
मुंबई: सियाचिन, डोकलाम आणि लडाख या उंचावरील युद्धक्षेत्रात, बर्फाळ भागात तैनात असलेल्या जवानांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अत्यावश्यक कपडे आणि खाद्यपदार्थांसाठी सैनिक दररोज संघर्ष करत असल्याचे कॅगच्या अहवालातून उघड म्हटले आहे.
पुरेसे कपडे, बूट, स्लिपींग बॅगचा तुडवडा तर जवानांना उष्ण कॅलरी युक्त पोषक आहार सुद्धा पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने सैनिकांच्या कॅलरीग्रहणात ८२ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे कॅगने स्पष्ट केले आहे. दरम्यान विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. “आपल्या प्राणांचीही पर्वा न करता देशाच्या रक्षणासाठी झटणारे सैनिक हे देशासाठी अनमोल आहेत. पण त्यांच्या सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या या सरकारला फक्त निवडणुकीत सैन्याच्या शौर्याची आठवण येते. सरकारच्या लेखी सैनिकांच्या जीवाची किंमत कवडीमोल असल्याचे पुन्हा सिद्ध झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
दरम्यान, जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, “सियाचीन येथे देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना कपडे, अन्न व अन्य साहित्य पुरवले गेले नाही.केंद्र सरकारचा सैन्यांच्या प्रति अक्षम्य दुर्लक्षपणा यातून दिसून येतो. देशभक्तीच्या बाता करून भाजपचे लोक देशातील जनतेची फसवणूक करत आहेत. खरंतर कॅगने भाजपच्या खोट्या राष्ट्रभक्तीचा बुरखा फाडला.”





