#IPL2023 : जसप्रीत बुमराह ‘IPL’सह ‘या’ महत्वाच्या स्पर्धेसही मुकणार

मुंबई – भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखण्यातून अद्याप पूर्ण तंदुरुस्त ठरलेला नसल्याचे आता समोर येत आहे. त्यामुळेच त्याला यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या संपूर्ण मौसमालाही मुकावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. त्याच्या पाठदुखीवर उपचारही करण्यात आले आहेत. मात्र, त्याला अद्याप मॅचफिटचे प्रमाणपत्र राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) दिलेले नाही. त्यातच त्याला कंबरदुखीचाही त्रास होत आहे. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीमुळेच त्याला लवकरच तंदुरुस्त ठरण्यात अपयश येत आहे.
यंदाची आयपीएल स्पर्धाच नव्हे तर तो यंदा भारतातच होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतही खेळेल किंवा कसे याबात अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/former-bcci-president-sourav-ganguly-criticizes-batsman-lokesh-rahul/
तसेच त्यापूर्वी जून महिन्यात इंग्लंडमध्ये होत असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही तो खेळेल का नाही हे स्पष्ट झालेले नाही.





