IND vs ENG : जसप्रीत बुमराहचा नकोसा विक्रम! कसोटी कारकीर्दीतील नोंदवली सर्वात खराब कामगिरी

IND vs ENG Jasprit Bumrah’s Poor Performance in 4th Test : सध्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत नंवर वन असलेल्या जसप्रीत बुमराहची गणना जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये होते. त्याच्या यॉर्कर चेंडूचा सामना करणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नसते. पण इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात त्याची कामगिरी अत्यंत खराब राहिली. इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याच्याविरुद्ध सहजपणे धावा काढल्या आणि बुमराह त्याच्या लाईन आणि लेंथपासून पूर्णपणे भटकलेला दिसला. ज्यामुळे त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली.
बुमराहने पहिल्यांदाच खर्च केल्या १०० पेक्षा जास्त धावा –
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने ३३ षटकांत ११२ धावा देऊन केवळ २ विकेट्स घेतल्या. बुमराहच्या कसोटी कारकीर्दीत प्रथमच असे घडले आहे की, त्याने एका कसोटी डावात १०० पेक्षा जास्त धाव दिल्या. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. खराब गोलंदाजीमुळे बुमराहला असा वाईट दिवस पाहावा लागला.
Instead of India's batter, bowlers are scoring 100s. 😭
Jasprit Bumrah
Siraj
Ravindra Jadeja
Washington Sundar #ENGvIND #INDvsENG pic.twitter.com/xSUpDhtefJ— Punny (@PunnyBhaiya) July 26, 2025
कसोटीत घेतल्यात २०० पेक्षा जास्त विकेट्स –
जसप्रीत बुमराहने २०१८ मध्ये भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने अनेक परदेशी दौऱ्यांवर आपल्या गोलंदाजीची छाप पाडली. आतापर्यंत त्याने ४८ कसोची सामन्यांत एकूण २१९ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात १५ वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम समाविष्ट आहे.
हेही वाचा – Asia Cup 2025 : आशिया कपच्या तारखा जाहीर! भारत-पाक ‘या’ दिवशी भिडणार
इंग्लंडने घेतली ३११ धावांची मजबूत आघाडी –
चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ३५८ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी शतके ठोकली. या खेळाडूंमुळे इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. स्टोक्सने १४१ धावा आणि जो रूटने १५० धावांचे योगदान दिले, तर बेन डकेटने ९४ धावा जोडल्या. इंग्लंडने पहिल्या डावात ६६९ धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या आधारे ३११ धावांची मजबूत आघाडी मिळवली.





