Japanese Fans Clean : यालाच म्हणतात संस्कार! FIFA विश्वचषक सामन्यानंतर जपानी चाहत्यांनी जिंकली जगाची मनं; पाहा VIDEO
Japanese Fans Clean : या ऐतिहासिक सामन्यानंतर जपानच्या फुटबॉल चाहत्यांनी मैदानाबाहेर जे काही केले, त्याने केवळ स्टेडियममधीलच नव्हे तर संपूर्ण जगातील क्रीडाप्रेमींचे मनं जिंकली आहेत.

Japanese Fans Stadium Cleaning after match Video Viral : ‘फिफा विश्वचषक २०२६’ स्पर्धेत जपान आणि नेदरलँड्स यांच्यात झालेला रोमांचक सामना २-२ असा बरोबरीत सुटला. कागदावर बलाढ्य असलेल्या नेदरलँड्स संघाला जपानने ज्या पद्धतीने झुंजवले, ते पाहता हा ड्रॉ जपानसाठी एखाद्या विजयापेक्षा कमी नव्हता. मात्र, या ऐतिहासिक सामन्यानंतर जपानच्या फुटबॉल चाहत्यांनी मैदानाबाहेर जे काही केले, त्याने केवळ स्टेडियममधीलच नव्हे तर संपूर्ण जगातील क्रीडाप्रेमींचे मनं जिंकली आहेत. जपानच्या या अनोख्या संस्कृतीचे कौतुक खुद्द फिफाने केले आहे.
८८ व्या मिनिटाला दाइची कामदाचा चमत्कार!
सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये जपानच्या अभेद्य डिफेन्सने नेदरलँड्सला एकही गोल करू दिला नाही. दुसऱ्या हाफमध्ये मात्र खेळाला वेग आला. ५० व्या मिनिटाला नेदरलँड्सच्या रयान ग्रावेनबेर्खच्या फ्री-किकवर कर्णधार वर्जिल वैन डाइक याने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ५७ व्या मिनिटाला जपानच्या नाकामुराने गोल करत १-१ अशी बरोबरी साधली.
६४ व्या मिनिटाला नेदरलँड्सच्या समरविलने एक अप्रतिम कर्लिंग शॉट मारून डच संघाला २-१ ने पुढे केले. नेदरलँड्सचा विजय पक्का वाटत असतानाच, खेळ संपण्याच्या अगदी २ मिनिटे आधी म्हणजेच ८८ व्या मिनिटाला जपानच्या दाइची कामदाने कोकी ओगावाच्या पासवर गोल करत सामना २-२ असा ड्रॉ केला आणि जपानचा पराभव टाळला.
कचरा उचलून साफ केले स्टेडियम; फिफाने शेअर केला व्हिडीओ –
The reason Japan fans clean the stadium after each game. Respect. 🤝🇯🇵 pic.twitter.com/o9qJUOLefY
— FIFA (@FIFAcom) June 15, 2026
सामना संपल्यानंतर जपानच्या चाहत्यांनी स्टेडियमच्या स्टँड्समध्ये पसरलेला कचरा, पाण्याच्या बाटल्या आणि सीटच्या बाजूला पडलेली घाण स्वतः गोळा करण्यास सुरुवात केली. फिफाने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर जापानी चाहत्यांचा हा स्वच्छता मोहीम राबवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एका महिला चाहतीने सांगितले की, “आम्ही आमच्या खेळाडूंचा आणि स्टेडियमचा आदर करतो. आम्ही हे मैदान असेच घाणेरडे सोडून जाऊ शकत नाही.”
शिबुया क्रॉसिंगवर शिस्तीत जल्लोष!
Japanese discipline is really something else.
During the celebrations, hundreds of fans gathered in the middle of a busy intersection while the traffic light was red, singing, chanting, and enjoying the moment together.
The instant the light turned green, they calmly stepped…
— Out of Context Human Race (@NoContextHumans) June 15, 2026
या ऐतिहासिक कामगिरीनंतर जपानची राजधानी टोक्यो येथील प्रसिद्ध शिबुया क्रॉसिंगवर हजारो चाहते जपानचा झेंडा घेऊन जल्लोष करण्यासाठी जमा झाले. विशेष म्हणजे, जल्लोष करतानाही त्यांनी वाहतुकीला कोणताही अडथळा आणला नाही. सिग्नल लाल झाल्यावर चाहते रस्त्यावर येऊन नाचायचे आणि सिग्नल हिरवा होताच शिस्तीत बाजूला व्हायचे. जपानच्या या क्रीडा संस्कृतीची सध्या जगभरात जोरदार चर्चा होत आहे.





