Japan Open 2024 : अश्मिता, मालविकाला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का…

Japan Open 2024 : – भारतीय शटलर्स अश्मिता चलिहा आणि मालविका बनसोड यांना जापान ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. यासह दोन्ही खेळाडूंचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
मंगळवारी झालेल्या पहिल्या फेरीत अश्मिताला अव्वल मानांकित चायनीज तैपेईच्या ताई त्झू यिंगकडून 16-21, 12-21 असे पराभूत व्हावे लागले. तर दुसरीकडे मालविकाला युक्रेनच्या पोलिना बुहरोवाने 21-23, 19-21 असे पराभूत केले.
मिश्र दुहेरीतील आव्हान संपुष्टात…
तर मिश्र दुहेरीमध्ये राऊंड आॅफ 32 मध्ये भारताच्या सतीशकुमार करुणाकरन आणि आद्य वरियाथ यांच्या जोडीसमोर इंडोनेशियाच्या रेहान नौफल कुशारजंतो आणि लिसा आयु कुसुमावती यांचे आव्हान होते. मात्र इथेही भारताच्या पदरी निराशा हाती लागली आहे.
सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धा : जॅनिक सिनर, आर्यना सबालेन्का यांनी पटकावले विजेतेपद
इंडोनेशियाच्या जोडीनं भारतीय जोडीला 21-10, 21 -18 असं पराभूत केलं. नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी असलेल्या एकाही शटलरने या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला नाही.





