Wimbledon Men Final : नोव्हाक जोकोविचचे २५ व्या ग्रँड स्लॅमचे स्वप्न भंगले; गतविजेता सिनर आणि ज्वेरेव्ह यांच्यात रंगणार फायनल
Wimbledon Men Final : यंदाच्या जेतेपदाच्या सामन्यात जर्मनीचा स्टार खेळाडू अलेक्झांडर ज्वेरेव्ह आणि इटलीचा जागतिक नंबर-१ टेनिसपटू यानिक सिनर यांच्यात हाय-व्होल्टेज थरार पाहायला मिळणार आहे.

Wimbledon 2026 Semifinal Sinner beat Djokovic Zverev reach final : टेनिस विश्वातील सर्वात मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या ‘विम्बल्डन २०२६’ ( Wimbledon 2026 ) ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. यंदाच्या जेतेपदाच्या सामन्यात जर्मनीचा स्टार खेळाडू अलेक्झांडर ज्वेरेव्ह आणि इटलीचा जागतिक नंबर-१ टेनिसपटू यानिक सिनर यांच्यात हाय-व्होल्टेज थरार पाहायला मिळणार आहे. उपांत्य फेरीत ज्वेरेव्हने ब्रिटनच्या स्थानिक हिरो आर्थर फ्रेचा पराभव केला, तर गतविजेत्या यानिक सिनरने टेनिस इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू नोव्हाक जोकोविचला सरळ सेटमध्ये पराभूत करत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली.
रॉयल बॉक्समध्ये सचिन, लारा आणि शुबमन गिलची हजेरी – (Wimbledon Men Final)
विम्बल्डनच्या ऐतिहासिक ‘सेंटर कोर्ट’वर शुक्रवारी १० जुलै रोजी पुरुष एकेरीचे उपांत्य सामने खेळवले गेले. हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी रॉयल बॉक्समध्ये क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. क्रिकेट विश्वातील ‘गॉड’ सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचे महान फलंदाज ब्रायन लारा यांच्यासोबत भारताचा विद्यमान कसोटी व एकदिवसीय संघाचा कर्णधार शुबमन गिल देखील रॉयल बॉक्समध्ये सामना पाहताना दिसला.
जोकोविचचे २५ वे स्वप्न धुळीस; सिनरचे निर्भेळ वर्चस्व – (Wimbledon Men Final)
✨ Finals weekend ✨#Wimbledon pic.twitter.com/ejuE1JACwu
— Wimbledon (@Wimbledon) July 11, 2026
टेनिस जगताचे सर्वाधिक लक्ष नोव्हाक जोकोविच आणि यानिक सिनर यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यावर होते. गेल्या अडीच वर्षांपासून आपल्या २५ व्या ग्रँड स्लॅम जेतेपदासाठी झगडणाऱ्या ३९ वर्षीय जोकोविचला पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला. क्वार्टर फायनलमध्ये सव्वा पाच तासांचा मॅरेथॉन सामना खेळून थकलेल्या जोकोविचला सिनरने कोणतीही संधी दिली नाही. जागतिक नंबर-१ सिनरने अवघ्या काही तासांत जोकोविचचा ६-४, ६-४, ६-४ असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
फ्रेंच ओपन विजेत्या ज्वेरेव्हची फायनलमध्ये पहिल्यांदाच एन्ट्री! (Wimbledon Men Final)
✨ Finals weekend ✨#Wimbledon pic.twitter.com/ejuE1JACwu
— Wimbledon (@Wimbledon) July 11, 2026
दुसरीकडे, दुसरी सीड असलेल्या जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेव्हने ब्रिटनच्या वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळालेल्या आर्थर फ्रेचे आव्हान ७-६ (७-०), ६-२, ६-४ असे संपुष्टात आणले. आर्थर फ्रेने पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमच्या उपांत्य फेरीत धडक मारून सर्वांना चकित केले होते, पण नुकतेच फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या ज्वेरेव्हने आपला दांडगा अनुभव पणाला लावत पहिल्यांदाच विम्बल्डनच्या फायनलमध्ये जागा मिळवली. (Wimbledon Men Final)





