फेक AI फोटोंच्या ट्रेंडवर भडकली जान्हवी कपूर; म्हणाली “माझ्या परवानगीशिवाय…”

Janhvi Kapoor | ‘घिबली’ फोटोंच्या ट्रेंडनंतर आता ‘गुगुल जेमिनाय रेट्रो एआय’ फोटो ट्रेंडने सोशल मिडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या ट्रेंडला फॉलो करणारा मोठा वर्ग आहे. मात्र आता अभिनेत्री जान्हवी कपूरने यावर नाराजी व्यक्त केली आहे. कारण काहीजण सेलिब्रिटींचे फोटो एआयमध्ये एडिट करून व्हायरल करत आहेत.
जान्हवी कपूरने एका मुलाखतीत सांगितले की, “जेव्हा मी सोशल मीडियावर पाहते, तेव्हा माझे इतके एआय फोटो माझ्या परवानगीशिवाय व्हायरल होताना दिसतात. तुम्ही आणि मी म्हणू शकतो की हा एआय फोटो आहे, पण सामान्य माणूस विचार करेल, ‘ही काय असे कपडे घालून फिरतेय’. याबाबतीत मी खरंच जुन्या विचारांची आहे. माणसांच्या क्रिएटिव्हिटीची सुरक्षा आणि कथाकथनात प्रामाणिकपणा टिकवून ठेवण्याच्या महत्त्वावर मी अधिक जोर देते.” जान्हवीचे अभिनेता वरुण धवननेही समर्थन केलं. Janhvi Kapoor |
वरुणनेही एआयच्या या ट्रेंडबाबत म्हंटले की, “तंत्रज्ञान हे दुधारी तलवार आहे. ते उपयुक्त आहे, पण याचे तोटेही आहेत. अभिनेते, अभिनेत्री आणि त्यांच्या ओळखीचा दुरुपयोग होऊ नये यासाठी कायदा आणि नियमांची आवश्यकता आहे. अखेर मानवी भावनाच चित्रपटाला खास बनवतं. कोणतंच अल्गोरिदम या मानवी भावनांना कॉपी करू शकत नाही.” Janhvi Kapoor |
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि वरुण धवन आगामी ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. येत्या 2 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये जान्हवी आणि वरूणसह सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, अक्षय ओबेरॉय आणि मनीष पॉल यांच्याही भूमिका आहेत. Janhvi Kapoor |
हेही वाचा:





