Kiran Mane | Jammu & Kashmir Terrorist Attack | जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर गोळीबार केला. या हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी झाले आहेत. ही बस शिव खोडी मंदिरापासून कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिराकडे जात असताना पोनी परिसरातील तेरायथ गावाजवळ दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर चालकाचा ताबा सुटला आणि ही बस खोल दरीत कोसळली. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. याशिवाय लेफ्टनंट गव्हर्नर यांनी जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ ते दहा जणांचा ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुकू आहे. दरम्यान याप्रकरणी अभिनेते किरण माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केली आहे. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. किरण माने यांची फेसबुक पोस्ट; काय म्हणाले, पाहा…. जम्मू-कश्मीरमध्ये हिंदु देवता वैष्णोदेवीच्या यात्रेकरूंच्या बसवर अतिरेकी हल्ला झाला. अनेक हिंदु यात्रेकरू मृत्यूमुखी पडले. अनेक हिंदु मरणाच्या दारात आहेत. याला दोन दिवस उलटलेत. आपल्या पंतप्रधानांनी हिंदु जखमींची भेट सोडा, हिंदु कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी एक साधे ट्विट करण्याची तसदी घेतलेली नाही, याची नोंद भक्तडुक्करपिलावळीने घ्यावी. जय जगन्नाथ !