अखेर युद्ध पेटलं… जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, होशियारपूरवर पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; भारताचाही प्रतिहल्ला, ड्रोन हवेतच नष्ट केले

India Pakistan Attack: सीमेवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू आहे. अनेक भागात ब्लॅकआउट आहे आणि मोबाईल नेटवर्कमध्येही समस्या आहेत. सायरनचे आवाज दूरवर ऐकू येतात. सांबा, पूंछ आणि जम्मू सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे.
श्रीनगर, अवंतीपोरा येथे पूर्णपणे वीजपुरवठा खंडित झाला आहे. कुंपवाडा सेक्टरमध्येही जोरदार गोळीबार सुरू आहे आणि भारतीय सैन्य त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. जम्मू विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु भारतीय लष्कराने तो निष्क्रिय केला आहे. जम्मू विद्यापीठाजवळही दोन क्षेपणास्त्रे टाकल्याचे वृत्त आहे.
एस ४०० क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेने ८ क्षेपणास्त्रे पाडली –
या काळात भारताने आठ क्षेपणास्त्रे पाडली आहेत. पुन्हा एकदा भारताने एस ४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने पाकिस्तानची क्षेपणास्त्रे नष्ट केली आहेत. पंजाबमधील गुरुदासपूर आणि पठाणकोटमध्येही ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.
भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या सक्रियतेमुळे जम्मूमध्ये वीज खंडित होत आहे. जम्मू नागरी विमानतळ, सांबा, आरएस पुरा, अर्निया आणि शेजारच्या भागात पाकिस्तानकडून किमान आठ क्षेपणास्त्रे डागण्यात आली आणि त्यापैकी बहुतेक क्षेपणास्त्रे भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने रोखली.





