जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलकांच्या दगडफेकीत एकाचा मृत्यू

श्रीनगर : जम्मू- काश्मीरमधील कलम 370 रद्द झाल्यानंतर राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध अजूनही काश्मीरमधील काही गट करताना दिसत आहेत. त्याचाच भाग म्हणून काही आंदोलकांनी एका ट्रकवर दगडफेक केली. दरम्यान, या दगडफेकीत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दगडफेक करणाऱ्या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.
Jammu & Kashmir Police: The stone pelter has been identified and arrested. https://t.co/Lyxg14wBHM
— ANI (@ANI) August 26, 2019
अनंतनाग जिल्ह्यात आंदोलकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला. नूर मोहम्मद डार असे या ट्रक चालकाचे नाव असून ते जरादीपुरा उरानहाल येथे राहत होते. नूर मोहम्मद डार घरी जात असताना काल संध्याकाळी आंदोलकांनी सुरक्षा रक्षकांची गाडी म्हणून त्यांच्या ट्रकवर दगडफेक केली. या दगडफेकीत नूर मोहम्मद डार यांच्या डोक्याला दुखापत झाली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, दगडफेक करणाऱ्या एका आरोपीची ओळख पटली असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी श्रीनगर येथील संयुक्त राष्ट्रांच्या लष्करी निरीक्षकाच्या स्थानिक कार्यालयावर मोर्चा नेण्याचे आवाहन करणारी भित्तीपत्रके फुटीरतावाद्यांनी काही ठिकाणी लावल्याने याठिकाणी पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यातील सर्व बाजारपेठा अद्यापही बंद आहेत




