Jammu and Kashmir Election : जम्मू-काश्मीरमध्ये मतदानाचा तिसरा टप्पा लक्षवेधी; दुपारी 3 वाजेपर्यंत तब्बल ‘इतके’ टक्के मतदान, पाहा….

Jammu and Kashmir Election : जम्मू- केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. आज, मंगळवारी (1 ऑक्टोबर) तिसऱ्या टप्प्यात 40 जागांवर मतदान होत आहे. जम्मू विभागातील 24 आणि उत्तर काश्मीर खोऱ्यातील 16 जागांचे मतदार मतदानाचा हक्क बजावतील. तिसऱ्या फेरीत एकूण 415 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे विधानसभेच्या सर्व 90 जागांवर मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे.
पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबर रोजी 24; 25 सप्टेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात 40 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीची अधिसूचना 5 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर होती. 17 सप्टेंबरपर्यंत उमेदवारांनी आपली नावे मागे घेतली. आता मतदान आज म्हणजेच 1 ऑक्टोबरला होत आहे. हरियाणासोबतच जम्मू-काश्मीर विधानसभेचे निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर होतील.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 56.01 टक्के मतदान झाले. मदारसंघ आणि दुपारी तीनपर्यंत झालेले मतदानाची टक्केवारी कंसात : बांदीपूर ( 53.09), बारामुल्ला ( 46.09), जम्मू ( 56.74), कठुआ ( 62.43 ), कुपवाडा (52.98), सांबा ( 63.24), उधमपूर ( 64.43)
44.08% voter turnout recorded till 1 pm in the third and final phase of the Jammu and Kashmir Assembly elections.
Bandipore-42.67%
Baramulla-36.60%
Jammu-43.36%
Kathua- 50.09%
Kupwara-42.08%
Samba-49.73%
Udhampur-51.66% pic.twitter.com/08D6WPCf9g— ANI (@ANI) October 1, 2024
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 44.08 टक्के मतदान झाले.
बांदीपूर जिल्ह्यात 42.67 टक्के मतदान
बारामुल्ला जिल्ह्यात 36.60 टक्के मतदान
जम्मू जिल्ह्यात 43.36 टक्के मतदान
कठुआ जिल्ह्यात 50.09 टक्के मतदान
कुपवाडा जिल्ह्यात 42.08 टक्के मतदान
सांबा जिल्ह्यात 49.73 टक्के मतदान झाले
उधमपूर जिल्ह्यात 51.66 टक्के मतदान झाले
तिसऱ्या टप्प्यात किती मतदार?
या टप्प्यात विधानसभेच्या 40 जागा आहेत. त्यामध्ये 39,18,220 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. यामध्ये 20,09,033 पुरुष मतदार, 19,40,092 महिला मतदार आणि 57 इतर मतदारांचा समावेश आहे. 18 ते 19 वयोगटातील 1.94% तरुण मतदारांचा समावेश आहे जे पहिल्यांदा मतदान करण्यास पात्र आहेत. 35,860 अपंग मतदार आणि 85 वर्षांवरील 32,953 मतदार देखील तिसऱ्या फेरीत सहभागी होतील.
मतदारांच्या सुरळीत आणि त्रासमुक्त मतदानासाठी निवडणूक आयोगाने कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा, उधमपूर, सांबा, कठुआ आणि जम्मू या सात जिल्ह्यांमध्ये 5060 मतदान केंद्रे तयार केली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पीठासीन अधिकाऱ्यासह चार निवडणूक कर्मचारी तैनात असतील. या निवडणुकीसाठी एकूण 20 हजारांहून अधिक मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.





