मुंबई – पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला असून पोलिसांकडून गस्त वाढवण्यात आली आहे. तर संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कोकण किनारपट्टीवर खबरदारी म्हणून चेकपोस्ट तयार करण्यात आल्या आहेत. कोकणात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड तिन्ही जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर असून 24 तास गस्त सुरू करण्यात आली आहे.