Jamkhed News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणार मोफत कॅन्सर विरोधी मोहीम

जामखेड : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) हा महिलांमधील दुसऱ्या क्रमांकाचा गंभीर कर्करोग आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोफत HPV लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. संध्या सोनवणे यांनी केले आहे.
मंबईत 6 ऑगस्टला लसीकरण मोहीम
ॲड. संध्या सोनवणे यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश यांच्या आयोजनातून ही मोफत HPV लसीकरण मोहीम ६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मumbai येथील महिला विकास मंडळ, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरिमन पॉइंट, मंत्रालयाजवळ, मुंबई – ४०००२१ येथे आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश युवतींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण प्रदान करणे आहे.
HPV लसीकरणाचे फायदे
– पूर्ण संरक्षण: HPV विषाणूपासून होणाऱ्या कर्करोगाच्या संसर्गापासून पूर्ण संरक्षण.
– कर्करोगाचा धोका कमी: गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
– खर्च आणि वेदना बचत: कर्करोगावरील उपचारांचा खर्च आणि वेदना टाळता येतात.
– मानसिक समाधान: कुटुंबाला सुरक्षितता आणि मानसिक समाधान मिळते.
– जीवनभर आरोग्याची हमी: एकदा लस घेतल्याने जीवनभर आरोग्याची खात्री.
ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि शास्त्रीयदृष्ट्या मान्यताप्राप्त आहे. हा उपक्रम युवतींच्या निरोगी भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, यात सहभागी होण्याचे आवाहन ॲड. संध्या सोनवणे यांनी केले आहे. “जास्तीत जास्त युवतींनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि समाजात जागरूकता निर्माण करावी,” असे त्या म्हणाल्या.





