Jamkhed News : जामखेड LIC शाखेत पॉलिसीधारकाच्या नकळत १० लाखांचा अपहार; बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज लाटल्याचा आरोप!
Jamkhed News : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) जामखेड शाखेत ग्राहकाचा विश्वासघात करून त्यांच्या नकळत पॉलिसीवर तब्बल १० लाख रुपयांचे कर्ज उचलून आर्थिक अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Jamkhed News : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) जामखेड शाखेत ग्राहकाचा विश्वासघात करून त्यांच्या नकळत पॉलिसीवर तब्बल १० लाख रुपयांचे कर्ज उचलून आर्थिक अपहार केल्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. (Jamkhed News)
याप्रकरणी पीडित पॉलिसीधारकाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार व जामखेड पोलिसांकडे तक्रार अर्ज देऊन दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. (Jamkhed News)
तालुक्यातील वाघा येथील रहिवासी महेंद्र आजिनाथ बारस्कर यांची एलआयसीची २५ लाख रुपयांची पॉलिसी (क्र. 958554430) आहे. या पॉलिसीवर बारस्कर यांची कोणतीही संमती नसताना, कोणत्याही लोन फॉर्मवर सही अथवा अंगठा घेतलेला नसताना तसेच मूळ पॉलिसी बॉण्ड जमा केलेला नसताना परस्पर १० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. (Jamkhed News)
चौकशीदरम्यान १९ एप्रिल २०२२ रोजी ही कर्जाची रक्कम एलआयसी जामखेड शाखेतील कर्मचारी सचिन छगन शिंदे यांच्या भारतीय स्टेट बँक (SBI) खात्यात वर्ग करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Jamkhed News)
यावरून एलआयसी कर्मचारी व इतर संबंधित व्यक्तींनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे हा आर्थिक अपहार केल्याचा थेट आरोप अर्जात करण्यात आला आहे. विनासंमती कर्जासाठी वापरण्यात आलेल्या लोन फॉर्म, केवायसी (KYC) कागदपत्रे, बनावट स्वाक्षरी व अंगठ्याच्या ठशांची सखोल न्यायवैद्यक तपासणी व्हावी. १९ एप्रिल २०२२ रोजी बँकेत झालेला संपूर्ण व्यवहार व खात्यांची चौकशी करण्यात यावी. (Jamkhed News)
एलआयसी कर्मचारी सचिन छगन शिंदे व यात सहभागी असलेल्या इतर अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ नुसार फसवणूक, विश्वासघात व बनावट कागदपत्रे बनवल्याप्रकरणी तात्काळ FIR नोंदवण्यात यावा. (Jamkhed News)
बेकायदेशीरपणे काढलेले हे कर्ज तात्काळ रद्द करून ग्राहकाची पॉलिसी पूर्वस्थितीत आणली जावी. या प्रकरणाचा अधिकृत चौकशी अहवाल व मूळ कागदपत्रांची प्रत तक्रारदारास मिळावी. (Jamkhed News)
“हा माझ्या आर्थिक हितावर झालेला थेट दरोडा असून यामुळे माझे मोठे नुकसान झाले आहे,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया महेंद्र बारस्कर यांनी दिली. प्रशासनाने येत्या ८ दिवसांत यावर योग्य ती कायदेशीर कारवाई न केल्यास, येत्या ०१ सप्टेंबर २०२६ रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही व सनदशीर मार्गाने आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी अर्जाद्वारे दिला आहे. (Jamkhed News)





