जामखेड हादरले..! कुख्यात गुंड सागर मोहळकरवर भरदिवसा गोळीबार; परिसरात मोठी खळबळ
Jamkhed News : जामखेडमधील कुख्यात गुंड पैलवान सागर मोहळकरवर अज्ञात हल्लेखोरांनी सहा राऊंड गोळीबार केला आहे.
Updated On:

Jamkhed News : जामखेड शहरातील नुराणी कॉलनी परिसरात कुख्यात गुंड पैलवान सागर मोहळकर याच्यावर अज्ञात व्यक्तीकडून सहा राउंड फायर करण्यात आला. या धक्कादायक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, मोहळकर परिसरातून जात असताना अचानक हल्लेखोराने त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून फरार झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मोहळकरवर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असून, हा हल्ला जुन्या वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.





