अहमदनगरचा जमीर शेख बनला शिवराम; धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात केलं धर्मांतर, चर्चेला उधाण

छत्रपती संभाजीनगर – येथील बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमात बुधवारी एका मुस्लिम दाम्पत्याने धर्मांतरण केल्याची घटना घडली. हे कुटुंब अहमदनगर येथील त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. जमीर शेख असे यांच्या कुटुंबातील एकूण 9 सदस्यांनी धर्मांतरण केले आहे. धर्मांतरानंतर त्यांची नावे देखील बदलण्यात आली आहेत. जमीर शेख यांचे नाव आता शिवराम ठेवण्यात आले आहे. ही धर्मांतराची घटना राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकजण या घटनेवर सकारात्मक विरोधात्मक प्रतिक्रिया देत आहेत.
धर्मांतराच्या घटनेबाबत बोलताना जमीर शेख (शिवराम) म्हणाले की, “आजी-आजोबा जालना जिल्ह्यातीलं शेवता गावात राहत होते. पूर्वीपासून घरात देवीची उपासणा केली जायची. 1972 मध्ये पडलेल्या दुष्काळानंतर आजी-आजोबा पोट भरण्यासाठी अहमदनगरमध्ये आले. आधीपासूनच आम्ही हिंदू धर्माला मानतो. आई-वडिलांनी देखील आपण सनातनी असल्याचे मला शिकवलेय. आम्ही पूजा पाठ, देवाचं नामस्मरण करत असे, कुणाच्या काही बोलण्याकडे लक्ष दिले नाही. बऱ्याच दिवसांपासून धर्म परिवर्तन करण्याची आमची इच्छा होती. आता घरवापसी करून घेतली.
जमीर शेख पुढे म्हणाले, मला बोलवताना लोकांनी शिवराम म्हटले पाहिजे. यामुळे त्यांच्या तोंडात रामाचे स्मरण होईल. जे लोक प्रभूच नाव घेत नाही, त्यांच्या तोंडात देखील मला आवाज देतांना शिवराम असे निघेल. म्हणून मी माझे नाव शिवराम ठेवण्याचे ठरवले. मुलांची नावे कृष्णा आणि बळराम ठेवलेत. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी मुलांना देवांची नावे ठेवली असल्याचेही शिवराम म्हणाले.
नातेवाईकांनी कधीही माझ्या दुःखात माझी मदत केली नाही. त्यामुळे मी त्यांच्यापासून दूरच राहतो. मी आणि माझं कुटुंब कृष्ण भक्त आहे. आम्ही श्रीराम आणि सीताची पूजा करतो. दरवर्षी आम्ही गणपती बसवतो. असेही त्यांनी यावेळी सांगितले.





