Dhirendra Shastri : “भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो” – धीरेंद्र शास्त्री
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितली आहे.

Dhirendra Shastri – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितली आहे.
आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला, ज्यांच्यापासून हिंदू राष्ट्राची प्रेरणा घेतली त्यांचा अवमान करण्याचा विचार मनामध्येही येणार नाही, असे शास्त्री यांनी म्हटले. आपल्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मनापासून माफी मागतो असेही ते म्हणाले.
नागपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांसंबंधी एक वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
धीरेंद्र शास्त्री म्हणाले, काही लोकांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. ज्यांच्या स्वराज्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही हिंदू राष्ट्राचा संकल्प केला, त्यांची अवमानना तर दूरच पण स्वप्नातही कुणी निंदा केली तर ती सहन करणार नाही.
या देशातील प्रत्येक सनातनी आज जिवंत आहे, हिंदुत्वासाठी सजग आहे, तर त्याचे सर्वात मोठे श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जाते.
जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, ते सर्व आपलेच लोक आहेत. त्यामुळे आपापल्यात वाद घातला तर त्याचा फायदा दुसऱ्यांना होईल, असे त्यांनी म्हटले.





