बंदी उठताच जमात-ए-इस्लामीचा भारताला इशारा ; म्हणाले,”बांगलादेशात हस्तक्षेप केल्यास…”

Jamaat E Islami । बांगलादेशच्या अंतरिम सरकारन देशातील सर्वात मोठ्या इस्लामिक कट्टरतावादी पक्ष जमात-ए-इस्लामीवरील बंदी उठवली, त्यानंतर या पक्षाने आता भारतविरोधी रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. पक्षप्रमुख शफीकुर रहमान यांना भारतविरोधी आणि पाकिस्तान समर्थक मानले जाते. बांगलादेश सरकारने सांगितले की, जमात-ए-इस्लामी दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही, त्यामुळे त्यावरील बंदी उठवण्यात आली आहे. बंदी उठवताच पक्षप्रमुखांनी भारताला इशारा दिला आहे.
जमात-ए-इस्लामीचे प्रमुख शफीकुर रहमान यांनी, ‘त्यांच्या पक्षाला भारतासोबत स्थिर संबंध हवे आहेत, परंतु बांगलादेशच्या कारभारात नवी दिल्लीचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही.’ असे म्हटले आहे. तसेच शफीकुर रहमान इंडियन मीडिया करस्पॉन्डंट असोसिएशन बांगलादेश (IMCAB) च्या प्रतिनिधींसोबत भेट झाली त्यावेळी त्यांनी भारत आपला शेजारी देश असल्याचे सांगितले. शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात जमात-ए-इस्लामी आणि नवी दिल्ली यांच्यातील संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला होता, पण भविष्यात दोघांमधील संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा त्यांना आहे.
जमात-शफीकूर हिंसाचारात सहभागी नव्हते Jamaat E Islami ।
बांगलादेशी माध्यमांशी बोलताना शफीकुर म्हणाले, आम्ही एकमेकांचे शेजारी आहोत आणि शेजारी इच्छेनुसार बदलता येत नाहीत. ही अशी गोष्ट आहे जी नाकारता येत नाही. ते म्हणाले की, ‘जमात भारतावर किंवा इतर कोणत्याही देशावर जाणूनबुजून टीका करत नाही. पुढे ते म्हणाले की, ‘जमात-ए-इस्लामी शांतता आणि लोकशाहीला समर्पित आहे, त्यांचा पक्ष कधीही विध्वंसक कारवायांमध्ये गुंतलेला नाही. या पक्षाचा कोणताही सदस्य दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेला आढळल्यास तो देशाची माफी मागण्यास तयार आहे.’ असेही यांनी यावेळी म्हटले.
शफीकुर रहमान भारताबद्दल काय म्हणाले? Jamaat E Islami ।
दुसऱ्या एका निवेदनात भारताला सल्ला देताना शफीकुर रहमान म्हणाले की, ‘भारताने बांगलादेशच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये. जमात नवी दिल्ली आणि ढाका यांच्यातील घनिष्ठ संबंधांना समर्थन देते. पण बांगलादेशने अमेरिका, चीन आणि पाकिस्तान यांसारख्या देशांशी घनिष्ठ संबंध राखले पाहिजेत, असेही ते मानते. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शफिकूर म्हणाले की, नवी दिल्ली असे मानते की जमात भारतविरोधी आहे, पण तसे नाही. त्यांचा पक्ष फक्त बांगलादेशच्या हिताचीच चर्चा करतो.”
हेही वाचा
जपानमध्ये शानशान वादळाचा कहर ; अनेकांचा मृत्यू , ५० लाख लोकांचे स्थलांतर





