जपानमध्ये शानशान वादळाचा कहर ; अनेकांचा मृत्यू , ५० लाख लोकांचे स्थलांतर

Typhoon Shanshan in Japan । जपानमधील शानशान चक्री वादळामुळे सर्वत्र हाहाकार मजला आहे. सोसाट्याचा वारा अन् पावसामुळे याठिकाणी भूस्खलन झाले आहे. यामध्ये आतापर्यंत किमान 4 लोक मरण पावले आहेत, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने 50 लाखाहून अधिक लोकांचे स्थलांतर केले आहे.
जपानमध्ये आलेले हे चक्रीवादळ ताशी 250 किमी वेगाने वाढत आहे. सरकारने धोक्याचा इशारा दिला आहे. हवाई आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. जपानी हवामान एजन्सीने सांगितले की, कारखाने बंद करण्यात आले आहेत आणि क्युशूच्या नैऋत्य बेटावर वादळ आल्यामुळे कारखाने बंद करण्यात आली आहेत. वादळाची गती ताशी 250 किमी पर्यंत पोहोचली आहे. काही भागात यापूर्वीच 700 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे, झाडे उन्मळून पडले आहेत, तसेच वीजपुरवठा खंडित झाला असून त्याचा फटका तब्बल तर 2.5 लाख लोकांना बसला आहे.
घरे कोसळली, चार जणांनी आपला जीव गमावला Typhoon Shanshan in Japan ।
जपानच्या मीडियानुसार, मध्यवर्ती प्रांतातील भूस्खलनामुळे घर कोसळल्यानंतर 3 लोकांचा मृत्यू झाला, तर पश्चिमेस टोकुशिमामध्ये छप्पर कोसळल्यानंतर 80 वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाला. आतापर्यंत चार जणांनी आपला जीव गमावला आहे. त्याच वेळी, 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जपानच्या मेटेरोलॉजिकल एजन्सीचा हवाला देत ते म्हणाले की, टोकियोमध्ये अनेक नद्यांनी पुराचा धोका ओलांडला आहे. मेगुरो, नोगावा आणि सेनगावा नद्याजवळ अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
ट्रेन आणि एअर ट्रॅफिक सर्व बंद Typhoon Shanshan in Japan ।
परिस्थितीचे गांभीर्य पाहून सर्व सरकारी विभागांना उच्च सतर्क केले गेले आहे. 219 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे सध्या रद्द केली आहेत. सरकारने सांगितले की, वादळामुळे 8 लाख लोकांना इतर ठिकाणी हलवले जाणार आहे. राजधानी टोकियोमध्ये बुलेट गाड्या, गाड्या, उड्डाण आणि टपाल सेवा थांबवण्यात आल्या आहेत.





