जालिंदर सुपेकर आरोपांच्या फैऱ्यात, आता अमिताभ गुप्तांचेही नाव घेत शेतकरी नेते राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Raju Shetty : वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणामुळे चर्चेत आलेले विशेष महानिरीक्षक (कारागृह) जालिंदर सुपेकर यांच्यावर सातत्याने अनेक गंभीर स्वरुपाच्या आरोपांमुळे ते अडचणीत आले आहेत.
नुकताच पुण्यातील एका सावकाराच्या वकिलांनी सुपेकरांवर तब्बल 150 कोटींच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांनी १२०० रूपये किलोची काजूकतली खायला घातली मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही. कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला, असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच या दरामध्ये जपळपास ४० ते ६० तफावत होती असा देखील त्यानी आरोप केला आहे. त्यांनी त्यांच्या एक्सवरून यासंबंधीचे ट्वीट केले आहे.
खोट बोल पण रेटून बोल या प्रवृत्त्तीमुळे कारागृह विभागात भ्रष्ट्राचार वाढला …!
राज्यातील कारागृहात पुरवठा केले जाणारे रेशन साई मार्केटींग यांचेकडून केले जाते सदर ( अन्नधान्य) अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तपासणी व गुणवत्तेसाठी पाठवित असल्याचे साई मार्केटींगचे प्रमुख
— Raju Shetti (@rajushetti) June 1, 2025
शेट्टी यांनी तरुंगात होत असलेल्या रेशनिंग आणि कॅन्टीन साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले आहे. गेल्या ३ महिन्यांपासून राज्यातील तुरूंगात कारागृहात होणारा भ्रष्ट्राचार पुराव्यासह देवूनही का कारवाई झाली नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांनी १२०० रूपये किलोची काजूकतली खायला घातली मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही ……!
राज्यातील कारागृहात कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिका-यांनी रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार
— Raju Shetti (@rajushetti) June 5, 2025
दिवाळीत राज्यामध्ये जवळपास 5 कोटी रूपयाची खरेदी करण्यात आली आहे. सदरची खरेदी करण्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही. सोबत फराळाचे साहित्य व त्याचे दरपत्रक टाकले आहे, यावरून कारागृहात किती अनागोंदी कारभार चाललेला आहे, हे लक्षात येईल असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
तुरुंगातील आरोपीकडून ३०० कोटी मागितले : सुरेश धस
आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे की, “जालिंदर सुपेकर हे हगवणे कुटुंबाचे नातेवाईक असून, त्यांनी आयजी पदावर असताना एक लाख रुपये रोख आणि ५० हजार रुपयांचा मोबाईल घेतल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. तसेच, तुरुंगातील आरोपीकडून ३०० कोटी रुपये मागितल्याची तक्रारही माझ्याकडे आली आहे,” असं सुरेश धस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: Jalindar Supekar: जालिंदर सुपेकरांनी बँकेच्या लॉकरमधील पैसे अन् सोनं हडपलं; वकिलाच्या दाव्यानं खळबळ





