“बच्चू भाऊंना रक्ताची उलटी, अजून किती परीक्षा बघणार”; शेतकरी नेते राजू शेट्टींचा सरकारला सवाल, म्हणाले शेतकऱ्यांनी…

Farmer leader Raju Shetty : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, दिव्यांगाना अनुदान मिळावे यांसह १७ मागण्या घेऊन प्रहारचे प्रमुख बच्चू कडू अमरावती येथील गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळी अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनला काही संघटना आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे.
अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चू कडूंची तब्येत खालावली असून, त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत. मात्र, ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत. अशातच शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मोठं विधान करत सरकाराला सवाल केला आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी व दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी बच्चू कडू यांनी आपला जीव पणाला लावला आहे. गेल्या ६ दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे त्यांना रक्ताच्या उलट्या होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनात ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, असे शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले आहेत.
तसेच सरकारने गांभीर्याने या प्रश्नाकडे बघायला पाहिजे, असे म्हणत बच्चू भाऊंना रक्ताची उलटी झाली, अजून किती परीक्षा बघणार आहात, असा सवाल राजू शेट्टी यांनी सरकारला केला आहे. महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा शेतबारा कोरा केला जाईल, असे वचन देऊन मते घेतली आहेत, असे देखील शेट्टी म्हणाले.
१५ जूनला एकत्र येण्याचे आवाहन
मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघतली. ज्या कुचितपणाने त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे या प्रश्नाकडे बघतील असे म्हटले ती बाब अत्यंत संतापजनक आहे. सरकार अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण करणाऱ्या उपोषकर्त्याकडे बघणार असेल, तर त्याची प्रतिक्रिया समाजातून उमटले गरजेचे आहे, ज्यां संघटना आणि राजकीय पक्ष यांनी उपोषणाला पाठिंबा दर्शविला, त्यांनी मिळून ही मागणी केवळ बच्चू भाऊंची नाही, तर शेतकऱ्यांची आहे, यासाठी १५ जूनला एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी व दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी बच्चू कडू आपला जीव पणाला लावले आहेत.
गेल्या ६ दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे रक्ताच्या उलट्या होत आहेत.
शेतक-यांनो आंदोलनात आता आपली ताकत दाखविण्याची वेळ आली आहे. एक माणूस आपल्यासाठी स्वत:चा जीव pic.twitter.com/o6iw1XJgeX— Raju Shetti (@rajushetti) June 13, 2025
बच्चू कडू आंदोलनावर ठाम
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि दिव्यांगाना अनुदान मिळावे या मागणासह इतर १७ मागण्या सरकारने मान्य कराव्या यासाठी प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस असून, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषण स्थळाला दिली. मात्र, बच्चू कडू आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.
हेही वाचा:“आदमी खिलोना है…आता है जाता है.. ” म्हणत शेवटचे स्टेटस ; विमान अपघातात अंजु शर्मावर काळाचा घाला





